शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

मुंबई आरपीएफची मोठी कारवाई, एक्सप्रेस ट्रेनमध्ये सापडले 2 कोटींच्या ड्रग्जचे घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 20:36 IST

नवी दिल्लीहून एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून येणाऱ्या नायजेरियन आरोपीकडे असलेल्या बॅगमध्ये नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट अन्वये (एनडीपीएस) बंदी असलेले एमफेटामाइन हे अमली पदार्थ पोलिसांना सापडले.

ठळक मुद्देअटक आरोपीचे नाव सनी ओका आयके (वय ४१) असे त्याचे नाव असून, तो नायजेरियाचा नागरिक आहे. मध्य रेल्वेने बुधवारी ही माहिती दिली.रेल्वे पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल के. एन. शेलार आणि शिवाजी पवार यांनी नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे.

मुंबई-  रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) पथकाने मोठी कारवाई केली आहे. नवी दिल्ली - एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून तब्बल २ कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ आरपीएफने जप्त केले आहे. अटक आरोपीचे नाव सनी ओका आयके (वय ४१) असे त्याचे नाव असून, तो नायजेरियाचा नागरिक आहे. मध्य रेल्वेने बुधवारी ही माहिती दिली.नवी दिल्लीहून एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून येणाऱ्या नायजेरियन आरोपीकडे असलेल्या बॅगमध्ये नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट अन्वये (एनडीपीएस) बंदी असलेले एमफेटामाइन हे अमली पदार्थ पोलिसांना सापडले. त्याची किंमत अंदाजे २ कोटी रुपये आहे. रेल्वे पोलिसांनी या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. निळजे आणि तळोजादरम्यान अलार्म साखळी ओढून एक्स्प्रेस थांबवून नायजेरियन आरोपीला अटक करण्यात आली.  रेल्वे पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल के. एन. शेलार आणि शिवाजी पवार यांनी नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. तो नवी दिल्ली-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करत होता. नवी मुंबईतील निलजे आणि तळोजा या रेल्वे स्थानकांदरम्यान तो उतरला होता. त्याचवेळी सतर्क असलेले शेलार आणि शिवाजी पवार यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला ठाणे (दिवा) रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याची चौकशी केली.पासपोर्ट क्रमांक, नवी दिल्ली ते पनवेल, तृतीय वातानुकूलित डब्ब्यातून प्रवास केल्याचे सांगितले. पीएनआर क्रमांक सांगितला. नायजेरियन व्यक्तीच्या बॅगची तपासणी केली असता, संशयास्पद पदार्थ आढळून आला. पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, मध्य रेल्वे, मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी), मुंबई यांच्याशी संपर्क केला. त्यांची मदत घेतली गेली. तपास पथक, तज्ज्ञांसह आरपीएफ ठाणे दिवा येथे आले. पदार्थाची तपासणी केली असता २.३ किलो वजनाचे 'अ‍ॅम्फॅटामाइन्स’ नावाचे एक अंमली पदार्थ असल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत अंदाजे २ कोटी आहे. नार्कोटिक्स ड्रग्स अंड सायकोट्रोपिक सबस्टन्ससेस ( एनडीपीएस ) कायद्यांतर्गत प्रक्रिया सुरु आहे. आरोपी आणि जप्त केलेला अमली पदार्थ एनसीबी अधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आला.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात 

 

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थrailwayरेल्वेPoliceपोलिस