शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

मुंबई: आईच्या प्रियकराने केला मुलीवरच अत्याचार; आरोपीच्या दुसऱ्या प्रेयसीने काढला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:17 IST

Mumbai Crime: मुंबईत एका प्रेमी जोडप्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Crime:मुंबईतून अत्याचाराची विचित्र अशी घटना समोर आली आहे. मुंबईच्या उपनगरात एका जोडप्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत विकृतीचा कळस गाठला. आरोपीनं प्रेयसीच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला आणि पीडित मुलीला धमकावले. मुलीने धीर दाखवत तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितला आणि हे प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा प्रियकर आहे आणि तो त्याच्या दुसऱ्या प्रेयसीसोबत तिथेच राहत होता. 

एका प्रेमी जोडप्याने अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मुंबईच्या उपनगरातून समोर आला आहे. या घटनेचे मोबाइलवर व्हिडीओ बनवल्याचा दावाही या मुलीच्या आईने केला असून, याप्रकरणी पोक्सोसह संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांकडून जोडप्याला अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई एका खासगी कंपनीत काम करते. तिच्या सोबत आरोपी आणि त्याची प्रेयसी देखील काम करते. आरोपी तरुण आणि पीडित मुलीच्या आईचे चार वर्षापासून प्रेमसंबंध जुळल्याने ते एकत्र राहायचे. मात्र, आरोपीचे काही दिवसांपूर्वी दुसऱ्या तरुणीसोबत प्रेम जुळले, तेव्हा ती देखील आरोपी आणि पीडित मुलीच्या आईसोबत एकाच घरात राहू लागली.

१५ जून रोजी पीडित मुलीची आई कामावर असताना, आरोपीने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपींनी या अत्याचाराचा व्हिडीओ मोबाइलमध्येही शूट केला. याबाबत कोणालाही सांगितल्यास ठार मारू, अशी धमकीही दिली. घाबरलेल्या मुलीने काही दिवसांनी त्या घटनेबाबत आईला सांगितले.

त्यानंतर पीडित मुलीने आणि तिच्या आईने पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल केल्यानंतर पिडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. दोन्ही आरोपींनी काढलेले व्हिडीओ पुरावा मिटवण्याच्या उद्देशाने डिलीट केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी मोबाइल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीसMumbaiमुंबईsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण