शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

खासदारांनीच दाखल केला कर्मचाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:32 AM

Crime News : गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची खोटी नावे पुढे करून गॅस सिलिंडर काळ्याबाजारात विकल्याचे निदर्शनास येताच एजन्सीचे मालक असलेल्या खासदार राजेंद्र गावित यांनी नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

मीरा राेड : गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची खोटी नावे पुढे करून गॅस सिलिंडर काळ्याबाजारात विकल्याचे निदर्शनास येताच एजन्सीचे मालक असलेल्या खासदार राजेंद्र गावित यांनी नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यात एक शिवसेना महिला संघटक तथा माजी जिल्हा परिषद सदस्याचा पती आहे.खा. गावित यांची पूर्वीपासूनच मीरा रोडच्या शांतीनगर भागात देव मोगरा या नावाने भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशनची गॅस एजन्सी आहे. कंपनीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे सध्या प्रति गॅस सिलिंडरचे ५९४ रुपये घेणे बंधनकारक आहे.  असे असताना एजन्सीमधील व्यवस्थापक हृदयनाथ देवेंद्र किणी (रा. चंद्रपाडा, नायगाव पूर्व), बुकिंग क्लार्क देवी कोले (रा. एबेल पॅरेडाइज, डी मार्टजवळ, भाईंदर पश्चिम) व लिपिक प्रभाकर लक्ष्मण कारभारी (रा. कोळीवाडा, नायगाव पश्चिम) या तिघांनी संगनमत करून ग्राहकांची खोटी नावे नोंदवून प्रति सिलिंडर ७०० रुपयेप्रमाणे काळ्याबाजारात विकत होते. याप्रकरणी पाेलीस अधिक तपास करीत आहेत.हा प्रकार गावित यांच्या लक्षात येताच त्यांनी तिघा कर्मचाऱ्यांविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून किणी व कारभारी यांना अटक केली आहे. आरोपी हृदयनाथ किणी हा शिवसेना महिला संघटक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य चित्रा किणी यांचा पती आहे. फिर्याद देतेवेळी या आरोपींनी ५ सिलिंडर हे ग्राहकांची खोटी नावे देऊन काळ्याबाजारात विकल्याचे व २ हजार ९७० रुपयांचा अपहार केल्याचे नमूद केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर