अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 21:11 IST2019-09-09T21:09:17+5:302019-09-09T21:11:07+5:30
सायन -ट्रॉम्बे महामार्गावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
ठळक मुद्देसमीर गिलानी शेख (वय २५ रा. चेंबूर) असे त्याचे नाव असून मित्र अफजल पटेल (२०) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - अज्ञात वाहनाने बेदरकारपणे दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. समीर गिलानी शेख (वय २५ रा. चेंबूर) असे त्याचे नाव असून मित्र अफजल पटेल (२०) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सायन - ट्रॉम्बे महामार्गावर शनिवारी रात्री फ्लाय ओव्हरच्या पुलाखाली ही घटना घडली. याबाबत चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे धडक दिलेल्या वाहनाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.