Uttar Pradesh: धक्कादायक! नातवाच्या हव्यासापोटी सासूनं सुनेवर करवला बलात्कार; पीडितेनं पोलिसांना सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 23:16 IST2022-06-04T23:15:43+5:302022-06-04T23:16:31+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदा येथील एका तरुणाला लग्न होऊन अनेक वर्ष झाले असतानाही मूल होत नव्हते. यामुळे नातवाच्या हव्यासापोटी संबंधित तरुणाच्या आईने, म्हणजेच पीडितेच्या सासूने, असे कृत्य केले...

Uttar Pradesh: धक्कादायक! नातवाच्या हव्यासापोटी सासूनं सुनेवर करवला बलात्कार; पीडितेनं पोलिसांना सांगितली आपबीती
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका महिलेने नातवाच्या हव्यासापोटी आपल्या सुनेवर बलात्कार करवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, सुनेला मुलबाळ नसल्याने सासूने तिच्या दिरांनाच रुममध्ये पाठवून तिच्यावर अत्याचार करवल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदा येथील एका तरुणाला लग्न होऊन अनेक वर्ष झाले असतानाही मूल होत नव्हते. यामुळे नातवाच्या हव्यासापोटी संबंधित तरुणाच्या आईने, म्हणजेच पीडितेच्या सासूने, आपल्या सुनेवर तिच्या दोन दिरांकडून बलात्कार करवला. यानंतर पीडितेने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावर पोलिसांनी घटनेची चौकशी करत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात बोलताना DSP शहर राकेश कुमार सिंह यांनीसांगितले, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोहल्ल्यामधील महिलेने तक्रार केली होती, कि तिच्या पतीच्या कमकुवतपणामुळे (कमजोरी) तिच्या सासूने वेगवेगळ्या दिवशी 2 युवकांना रूममध्ये पाठवून तिच्यावर बलात्कार करवला. यानंतर, प्रकरणाची चौकशी केली असता, संबंधित सासूने नातवाच्या हव्यासापोटी, असे कृत्य केल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून कारवाई केली जात आहे.