वडगावात मुलास विषारी औषध देऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 14:16 IST2022-07-28T14:14:36+5:302022-07-28T14:16:04+5:30
Suicide Case : लक्ष्मी मनोज भस्मे तर वेदांत भस्मे अशी त्यांची नावे आहेत.

वडगावात मुलास विषारी औषध देऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न
पेठवडगाव : पेठवडगाव (ता.हातकणंगले) येथे मुलास विषारी औषध देऊन आईनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज गुरूवारी दुपारी उघडकीस आली. लक्ष्मी मनोज भस्मे तर वेदांत भस्मे अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येच्या प्रयत्नाचे नेमके कारण समजू शकले नाही.
वेदांत यास उपाचारासाठी सीपीआर रूग्णालयात नेण्यात आल्याचे समजते. त्यांच्या बाबतीत नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. लक्ष्मी यांना वडगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.