अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षाची सक्तमजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 07:02 PM2021-10-20T19:02:36+5:302021-10-20T19:45:55+5:30

Molestation of a minor student : भुसावळ येथील सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी बुधवारी हा निकाल दिला. 

Molestation of a minor student; Five years prisonment to the teacher | अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षाची सक्तमजुरी 

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षाची सक्तमजुरी 

Next
ठळक मुद्देतौसीफउद्दीन याच्याविद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पीडित मुलीने फेब्रुवारी २०१६ मध्ये घरातील महिलांना हा प्रकार सांगितला.

 भुसावळ  जि. जळगाव :  अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तौसीफुद्दीन फरीदउद्दीन (५५, रा. जळगाव) शिक्षकाला  पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


भुसावळ येथील सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी बुधवारी हा निकाल दिला. पालिकेच्या शाळेत नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा आरोपी तौसीफुद्दीन हा पाच ते सहा महिन्यांपासून सतत विनयभंग करत होता. या प्रकरणी पीडित मुलीने फेब्रुवारी २०१६ मध्ये घरातील महिलांना हा प्रकार सांगितला. पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर असल्याने महिलांनी विद्यालय गाठले. तोपर्यंत शिक्षक पसार झाला होता.  मुलीच्या वडीलांनी  भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन तौसीफउद्दीन याच्याविद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले होते.  पिडीत मुलगी, फिर्यादी तसेच तपासाधिकारी आर. एम. वसत्कर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी व ५ हजाराचा दंड तर दंड न भरल्यास १ महिना सक्त मजुरीची शिक्षा  सुनावण्यात आली. सरकारतर्फे अतिरीक्त सरकारी अभयोक्ता विजय खडसे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. सागर चित्रे  यांनी तर पैरवी अधिकारी सहायक फौजदार समिना तडवी यांनी काम पाहिले.

Web Title: Molestation of a minor student; Five years prisonment to the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app