चित्रपट व मालिका ऑडिशनच्या नावाखाली युवतीचा विनयभंग : प्रभात रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 20:29 IST2019-08-24T20:25:58+5:302019-08-24T20:29:57+5:30
टीव्ही मालिका, फिल्मसाठी किरकोळ भूमिका करण्यासाठी लोकांचा पुरवठा करतो..

चित्रपट व मालिका ऑडिशनच्या नावाखाली युवतीचा विनयभंग : प्रभात रस्त्यावरील घटना
पुणे : फिल्म, टिव्ही सिरियलसाठीच्या ऑडिशनसाठी फोटो शुट करायचे असल्याचे सांगून युवतीला घरी बोलावून तिचा विनयभंग करणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे़.
मंदार संजय कुलकर्णी (वय २४, रा़. वसंत बहार अपार्टमेंट, प्रभात रोड) असे या तरुणाचे नाव आहे़. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या युवतीने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंदार कुलकर्णी व फिर्यादी युवती हे एकमेकांचे ओळखीचे आहेत़. फिल्म, टिव्ही मालिकांसाठी लागणाऱ्या अभिनयासाठी युवक युवतींची शिफारस करतो, असे सांगितले व या युवतीला त्याने अॅडिशनसाठी घरी बोलावले़. त्याप्रमाणे १६ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता ही युवती त्याच्या घरी आली़. मंदार याने तिला फोटो शुट करायचे आहे, असे सांगून तिचे बिकनीचे व पाठीचे फोटो मोबाईलवर काढले़ ते तिला दाखवून तिच्या कपड्याचे माप घेऊन अंगावरील कपडे काढण्यास सांगितले व तिला लज्जास्पद वाटेल असे कृत्य केले़, असे फिर्यादीत म्हटले आहे़. या युवतीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन मंदार कुलकर्णी याला अटक केली आहे़.
याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले की, मंदार कुलकर्णी याने आपण टीव्ही मालिका, फिल्मसाठी किरकोळ भूमिका करण्यासाठी लोकांचा पुरवठा करतो, असे सांगत आहे़. त्याने यापूर्वी अनेकांची अशाप्रकारे शिफारस केली आहे़. त्यातून यापूर्वी असे अनेक प्रकार घडले असण्याची शक्यता आहे़. मात्र, अजून कोणी तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही़.