चाकण परिसरात अल्पवयीन भाचीचा विनयभंग, नैराश्यातून मामाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 18:41 IST2018-12-03T18:34:45+5:302018-12-03T18:41:52+5:30
१३ वर्षांंची भाची तिच्या चुलत मामाकडे शिकण्यासाठी होती.

चाकण परिसरात अल्पवयीन भाचीचा विनयभंग, नैराश्यातून मामाची आत्महत्या
चाकण : चाकण परिसरामध्ये विनयभंगाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मामा-भाचीच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार चाकणमध्ये घडला आहे. तेरा वर्षाच्या अल्पवयीन भाचीचा ३९ वर्षाच्या मामाने विनयभंग केला.या घटनेत चाकण पोलीस ठाण्यात मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैराश्यातून मामाने आत्महत्या केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.या घटनेमुळे चाकण परिसर हादरले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१३ वर्षांंची भाची तिच्या चुलत मामाकडे शिकण्यासाठी होती. मामाने जेव्हा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीने हा सगळा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. यामुळे मामा आणि भाचीच्या कुटुंबांमध्ये घरच्यांमध्ये कडाक्याचे भांडणे झाली. त्यानंतर पीडितेच्या घरच्यांनी पोलिसांत याविरोधात तक्रार दाखल केली.पण अद्याप मृत्यूचं ठोस कारण पोलिसांकडून देण्यात आलेलं नाही.