शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या मोक्काच्या आरोपीला पडली पोलिसांची हातकडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 5:56 PM

मागील पाच महिन्यांपासून होता फरार..

पिरंगुट : मागील पाच महिन्यांपासून मोक्का अंतर्गत गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पौड पोलिसांनी त्याच्याच लग्नात त्याला अटक केल्याने या आरोपीच्या हातामध्ये त्याच्या लग्नाच्या दिवशी लग्नाच्या बेडी बरोबर पोलिसांची ही बेडी पडली.याप्रकरणी पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसार, ३०७ व मोक्यातील आरोपी असलेला अक्षय रोहिदास पडळघरे ( वय २३ वर्षे रा.पडळघरवाडी,रिहे ता. मुळशी) हा मागील पाच महिन्यांपासून फरार होता. तेव्हा पोलीस त्याच्या मागावरतीच होते.पोलिसांना या आरोपीचे लग्न हे पडळघरवाडी (ता,मुळशी) येथे असल्याची गोपनीय माहिती पौडचे पोलिस हवालदार अब्दुल शेख यांना मिळाली. तेव्हा या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, हवालदार अब्दुल शेख, बाबा शिंदे,  शिपाई सुहास सातपुते, नाईक जय पवार, हवालदार संतोष कुंभार यांचे पथक तात्काळ त्या ठिकाणी पाठविण्यात आले तेव्हा या पथकाने त्याठिकाणी जात सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीस अटक केली.तेव्हा या अटकेने आरोपीच्या हातामध्ये एकाच दिवशी लगाच्या बेडी बरोबर पोलिसांची ही बेडी पडली.

 

टॅग्स :pirangutपिरंगुटmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस