MNS went to police stations against hawkers | मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसेची पोलिसात धाव 
मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसेची पोलिसात धाव 

ठळक मुद्देदादर, शिवाजी पार्क आणि माहीम पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले.

मुंबई - केवळ १० रुपयांसाठी दादर मार्केटमध्ये फेरीवाल्याने हत्या केल्याने दादर परिसरात एकाच खळबळ उडाली होती.  गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मुजोर फेरीवाल्यांविरोधात मनसेनी दादर, शिवाजी पार्क आणि माहीम पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
गेल्या सोमवारी सोहनीलाल नामक परप्रांतीय फेरीवाल्यांनी रागाच्या भरात  फक्त १० रुपयांसाठी एका ग्राहकाचा खून केला होता. अशा मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी यासाठी मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय फेरीवाले रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर क्षेत्राच्या आत बसत आहे मुंबईतील अशा सर्व मुजोर व नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मनसेने पोलिसांना दिले आहे. 

Web Title: MNS went to police stations against hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.