शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आक्षेपार्ह पोस्टसाठी सोशल मीडियाचा गैरवापर, अफवा पसरवण्यात व्हॉट्स ॲप, फेसबुकची आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 21:51 IST

नागपुरात ६  गुन्ह्यांची नोंद, ९ जणांना अटक

ठळक मुद्देलॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यभरात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ५५२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे़. नागपूरात असे ११ गैरप्रकार घडले. राज्यभरात अनेक समाजकंटक, उपद्व्यापी मंडळी हे काम करत आहेत. अशा प्रकारे अफवा पसरवून त्यांनी सामान्य जनताच नव्हे तर शासन, प्रशासनालाही वेठीस धरण्याचा प्रकार चालविला आहे.

नरेश डोंगरे

नागपूर : कोरोना संसर्गाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून त्याला धार्मिक रंग चढवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकारात वाढ होऊ लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यभरात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ५५२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे़. नागपूरात असे ११ गैरप्रकार घडले. मात्र, प्रशासनाने ५ प्रकरण बेदखल केले. तर, ६  प्रकरणात गुन्हे नोंदविले आणि ९ जणांना अटक केली.राज्याच्या सायबर विभागाने केलेल्या अभ्यासात सर्वाधिक अफवा या व्हॉट्स ॲपवरुन पसरविल्या जात असल्याचे स्पष्ट झाले़ मात्र, सध्या व्हॉट्स अ‍ॅपपेक्षा फेसबुकवरुन अफवांचे पीक वाढत असल्याचेही दिसून येत आहे़. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी एखाद्या अस्त्रासारखा सोशल मिडियाचा गैरवापर केला जातो आहे.

राज्यभरात अनेक समाजकंटक, उपद्व्यापी मंडळी हे काम करत आहेत. अशा प्रकारे अफवा पसरवून त्यांनी सामान्य जनताच नव्हे तर शासन, प्रशासनालाही वेठीस धरण्याचा प्रकार चालविला आहे. नागपुरात कोरोणाच्या संदर्भाने जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्ताच्या संबंधानेही आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. नागनदीचे  पाणी घराच्या नळात येणार,  प्रतापनगरात एका मेडिकल स्टोअर्समध्ये तर  पाचपावलीत जनरल स्टोअरच्या संचालकाला, कोराडीत एका कंपनीच्या कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती. नागपुरात ज्या वेळी  दहा-बारा पॉझिटिव्ह होते त्यावेळी ५६ जणांना  कोरोणाची लागण झाल्याची अफवाही पसरविली होती. इमामवाड्यात लष्कर (मिलिटरी) आल्याचे तर सदरमधील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांना कोरोना झाल्याची अफवा समाजकंटकांनी पसरवली होती. त्यानंतर शहरात सर्वत्र खळबळ उडाली होती. याशिवाय वेगवेगळे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्याचेही प्रयत्न केले होते.सतर्क प्रशासनामुळे आलबेलकोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याच्या पहिल्या चरणा पासूनच पोलीस प्रशासन अलर्ट होते. त्यामुळे अफवा पसरवून जातीय तेढ तसेच दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नाला उधळून लावण्यात आले. सायबर शाखेने तातडीने आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करणाऱ्या ९ आरोपींना अटक केली. प्रसार माध्यमातून आवश्यक ती जनजागृती करण्यात आल्याने नागपुरात आतापर्यंत सामाजिक सौहार्द कायम राखण्यात यश मिळाले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या

 

दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही

 

मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिसnagpurनागपूरSocial Mediaसोशल मीडिया