शत्रुघ्न सिन्हा यांच्या निवासस्थानी पोलीस कर्मचाऱ्याकडून ''मिसफायरिंग'' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 18:30 IST2018-07-30T18:26:36+5:302018-07-30T18:30:29+5:30

७२ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा हे जुहूतील ‘रामायण’ नावाच्या इमारतीत आठव्या मजल्यावर झाला गोळीबार

Misfiring from police constable at Shatrughan Sinha's resident | शत्रुघ्न सिन्हा यांच्या निवासस्थानी पोलीस कर्मचाऱ्याकडून ''मिसफायरिंग'' 

शत्रुघ्न सिन्हा यांच्या निवासस्थानी पोलीस कर्मचाऱ्याकडून ''मिसफायरिंग'' 

मुंबई - अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. बंदोबस्तासाठी तैनात असलेला कॉन्स्टेबल हा भरलेली बंदूक हाताळत असतानाच अचानक गोळी सुटली. ७२ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा हे जुहूतील ‘रामायण’ नावाच्या इमारतीत आठव्या मजल्यावर राहतात. त्यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या बंदुकीतून बंदूक तपासात असताना हि घटना घडली. मात्र, गोळी चुकून झाडली असली तरी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 



 

Web Title: Misfiring from police constable at Shatrughan Sinha's resident