शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचे दागिने भामट्याने विकले हैदराबादला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 21:36 IST

दोन्ही भावांनी हैदराबादला पळ काढला होता.

ठळक मुद्दे सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.24 मे 2019 रोजी या अल्पवयीन मुलीच्या आईने मडगाव पोलीसात तक्रार केली होती.

मडगाव - हैदरबाद येथील मॉस्ट वॉन्टेड महमद इसाक (22) याने गोव्यातील नावेली येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचे लुटलेले सोन्याचे दागिने हैदराबाद येथे विकले होते. तेथील तीन दुकानात त्याने हे सोने विकले होते. मडगाव पोलिसांच्या पथकाने काल हैदरबाद येथे जाउन हे सोने जप्त केले आहे. गोव्यातही त्याने काही सोने विकल्याचा संशय आहे. दरम्यान, अधिक चौकशीसाठी या संशयिताच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. आज त्याला न्यायालयात उभे केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.तब्बल सहा महिन्याने महमद इसाक हा मागच्या आठवडयात पोलिसांना शरण आला होता. त्यापुर्वी 28 ऑगस्ट रोजी हे दागिने पळविण्यास संशयिताला मदत करणारा त्याचा भाऊ जब्बार अहमद याला मडगाव पोलिसांनी हैदराबाद येथे जाऊन अटक केली होती. सदया जब्बार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 24 मे 2019 रोजी या अल्पवयीन मुलीच्या आईने मडगाव पोलीसात तक्रार केली होती. या तक्रारीप्रमाणे, आरोपी इसाक याने नावेलीतील ती अल्पवयीन मुलगी टय़ूशनला जाताना तिच्याशी सलगी वाढवली. नंतर बळजबरीने तिला कोलवा आणि इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे विवस्त्रवस्थेतील फोटोही घेतले होते. हेच फोटो लोकांना दाखविणार अशी धमकी देऊन संशयिताने तिला घरातून दागिने आणण्यास भाग पाडले. हे दागिने संशयिताचा भाऊ जब्बार याने तिच्या फ्लॅटमध्ये येऊन घेतले होते. या प्रकरणाचा गवगवा होणार याचा सुगावा लागल्यावर या दोन्ही भावांनी नंतर हैदराबादला पळ काढला होता.मे 2017 ते जानेवारी 2019 पर्यंत आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर मडगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुजय कोरगावकर यांच्यासह पोलीस शिपाई गोरखनाथ गावस व विजयकुमार कामठाण यांचे पथक हैदराबादला रवाना झाले होते. त्यांनी मुख्य आरोपीचा भाऊ जब्बार याला 28 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. भावाला अटक झाल्यामुळे निरुपायाने शेवटी इसाकही नंतर मडगाव पोलिसांना शरण आला होता.इसाक याने कित्येकांना गंडा घातलेला असून हैदराबाद पोलिसांसाठीही तो वॉन्टेड आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकRobberyचोरी