पिंपरीत अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 20:07 IST2019-06-18T20:07:01+5:302019-06-18T20:07:35+5:30

आठ वर्षाच्या चिमुरडीवर एका इसमाने अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार केला..

Minor girl sexual harrashment by showing pornographic videos | पिंपरीत अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपरीत अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपरी : आठ वर्षाच्या चिमुरडीवर एका इसमाने अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार केला. ही घटना ५ ते १५ जून 2019 या काळात काळेवाडी येथे घडली. याबाबत मुलीच्या २६ वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्यंकटेश स्वामी (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. 
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीच्या घरासमोर भाड्याच्या खोलीत राहतो. ५ ते १५ जून या कालावधीत आरोपीने पीडीत अल्पवयीन मुलीला त्याच्या खोलीत नेले. तिला त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी शाळा सुरू झाल्यावर शाळेत न गेल्याने शिक्षकांनी पालकांकडे विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी मुलीच्या कुटुंबियांना धीर देत गुन्हा नोंदवला. आरोपीने घटनेनंतर पळ काढला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत...

Web Title: Minor girl sexual harrashment by showing pornographic videos