अ‍ॅसिडने जाळून अल्पवयीन मुलीची केली हत्या; बलात्कार करून तिला मारल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:32 IST2021-06-05T21:31:33+5:302021-06-05T21:32:13+5:30

Murder case :मुलीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीवर आधी बलात्कार केला आणि नंतर निर्घृण हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

Minor girl burnt to death by acid; Family members allege she was raped and then killed | अ‍ॅसिडने जाळून अल्पवयीन मुलीची केली हत्या; बलात्कार करून तिला मारल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

अ‍ॅसिडने जाळून अल्पवयीन मुलीची केली हत्या; बलात्कार करून तिला मारल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

ठळक मुद्देही घटना मुजफ्फरपूरच्या मनियारी पोलिस स्टेशन परिसरातील आहे. जिथे माधोपूर सुस्टा येथे राहणारी 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी 31 मे रोजी अचानक बेपत्ता झाली.

बिहारच्या मुझफ्फरपूर येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे काही उपद्रवी लोकांनी प्रथम अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर अ‍ॅसिडने जाळून तिला ठार केले. मुलीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीवर आधी बलात्कार केला आणि नंतर निर्घृण हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

ही घटना मुजफ्फरपूरच्या मनियारी पोलिस स्टेशन परिसरातील आहे. जिथे माधोपूर सुस्टा येथे राहणारी 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी 31 मे रोजी अचानक बेपत्ता झाली. घरातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यादिवशी जेव्हा ती आपल्या आईसह बाजारात जात होती, तेव्हा दोन स्कूटीवरील काही मुलांनी मुलीला पळवून नेले होते. घरातील सदस्यांनी मुलीचा शोध सुरू ठेवला पण तिचा काहीही पत्ता लागला नाही.

मुलीच्या त्रस्त कुटुंबीयांनी  २ जून रोजी मनियारी पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना ही घटना सांगितल्यानंतर सोनू कुमार आणि त्याच्या तीन भावांविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून पोलिस त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, कुधनी पोलिस ठाण्याच्या अक्राहा पुलाखालून एका मुलीचा जळालेला मृतदेह सापडला.

गुरुवारी पोलिसांनी मुलीचा मृतदेहाची ओळख पटवली. ती मणियारीच्या माधोपूर सुस्टा येथे राहणारी शंकर रायची एकुलती 17 वर्षांची मुलगी होती. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्या छायाचित्रांमधून त्याची ओळख पटली. मुलीला अ‍ॅसिडने जाळून टाकले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या घरात शोककळा पसरली आहे. कुटूंबाच्या तक्रारीच्या आधारे दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता तिन्ही आरोपींची चौकशी केली जात आहे.

 

 

 

 

Web Title: Minor girl burnt to death by acid; Family members allege she was raped and then killed