Minor girl abused by teacher in Nagpur | नागपुरात शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
नागपुरात शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

ठळक मुद्देचार महिन्यापासून सुरु होता प्रकार : २४ तासात तीन प्रकरणे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी शिकवणी वर्ग चालवणारा एक विदुर शिक्षक चार महिन्यांपासून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार करीत होता. अत्याचार वाढल्याने पीडित विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. अजनी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये दहशत पसरली आहे. साईबल सुनील चौधरी (५०) रा. चिंतान अपार्टमेंट, एनआयटी गार्डन असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याला अटक केली. याच प्रकारची घटना कामठी आणि कोराडी पोलीस ठाणे हद्दतही घडली. येथे ओळखीच्याच अल्पवयीन मुलांनीच हे कृत्य केले.
आरोपी शिक्षक साईबल चौधरी अजनीतील सेंट अ‍ॅन्थोनी चर्च जवळ कोचिंग क्लासेस चालवतो. पीडित १६ वर्षीय अल्पवयीन दहावीची विद्यार्थिनी आहे. ती चौधरीच्या कोचिंग क्लासेसमध्ये जाते. तिच्याशिवाय आणखीही विद्यार्थी-विद्यार्थिनी चौधरीकडे शिकायला येतात. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार चौधरी एक्स्ट्रा क्लासेसच्या नावावर विद्यार्थिनींना कोचिंगनंतर थांबवायचा. यानतर त्यांच्याशी प्रेम करण्याचे आमीष दाखवायचा. याप्रकारे चौधरीने १५ जुलै ते ५ नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान त्याने याची व्हिडिओ क्लिपींग बनवली. तो विद्यार्थिनीला अश्लील मॅसेज पाठवू लागला. याबाबत कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. चौधरीच्या भीतीपोटी विद्यार्थिनीने याबाबत कुणालाच सांगितले नाही. चौधरीच्या व्यवहाराने पीडित दहशतीत आली होती. तिला चौधरीचे अश्लील मॅसेज सातत्याने येत होते. यामुळे ती आपला मोबाईल घरच्यांच्या हाती लागू देत नव्हती. तिच्या व्यवहारात आलेल्या बदलामुळे तिच्या आईला शंका आली. ती मुलीवर नजर ठेवू लागली. यादरम्यान मुलीचा मोबाईल हाती लागल्याने आईला चौधरीचे मॅसेज सापडले. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. तिने मुलील विश्वासात घेऊन विचारपूस केली. पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी मंगळवारी अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली.
सूत्रानुसार चौधरी यापूर्वी सुद्धा मुलीच्या झेडखानी बाबत चर्चेत आला होता. दबावामुळे कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची कुणालाही माहिती होऊ दिली नाही. आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्साो व आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेमुळे विद्यार्थिनी प्रचंड दहशतीत आहे.
दुसरी घटना कोराडी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पीडित ११ वर्षीय मुलगी सहावीला शिकते. तिचे वडील वाहन चालक आहेत. आरोपीला १७ व १६ वर्षीय अल्पवयीन मुले आहेत. ते मुलीच्या शेजारीच राहतात. अत्याचाराची घटना २८ जून ते १ जुलै दरम्यान घडली. मुलीची आई मुलासोबत बाहेरगावी गेली होती. वडील ड्युटीवर गेले होते. यादरम्यान आरोपीनी पीडित मुलीला आपल्या घरी बोलावले व तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीने आरोपींच्या घरी जाणे बंद केले. काही दिवसांपासून मुलीच्या बदललेल्या स्वभावाबाबत आईला शंका आली. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. आईने कोराडी ठाण्यात बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
तिसरी घटना कामठी ठाणे अंतर्गत घडली. १७ वर्षीय विद्यार्थिनी आहे. आरोपी तिच्याच वयाचा असून त्याने शाळा सोडली आहे. २०१७ पासून त्याची विद्यार्थिनीशी मैत्री होती. त्याने विद्यार्थिनीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी त्याने लग्न करण्यास नकार दिला. मुलीने याबाबत घरच्यांना सांगितले. बुधवारी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
यापूर्वीही विद्यार्थिनींवर केला अत्याचार
चौधरी अनेक वर्षांपासून शिकवणी वर्ग चालवतो. त्याचे अजनीसह पश्चिम नागपुरातही कोचिंग क्लास आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी शिकायला येतात. चौधरीचे वागणे सुरुवतीपासूनच संशयास्पद आहे. त्याने इतर विद्यार्थिनींचेही शोषण केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली आहे. पोलिसांनी पीडित लोकांना तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
आठवडाभरातील सहावी घटना
अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची आठवडाभरातील ही सहावी घटना आहे. अल्पवयीन मुलीच्या शोषणाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बहुतांश घटनांमध्ये ओळखीचीच व्यक्ती यात सहभागी असते. या घटनांमुळे पालकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी या घटनांना गांभीर्याने घेतले आहे.

 

Web Title: Minor girl abused by teacher in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.