मकोकाचा फरार आरोपी गजाआड; खडकपाडा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 19:10 IST2019-05-13T19:08:43+5:302019-05-13T19:10:06+5:30
अखेर खडकपाडा पोलिसांनी काल त्याला आंबिवली इराणी वस्तीजवळ सापळा रचत अटक केली आहे.

मकोकाचा फरार आरोपी गजाआड; खडकपाडा पोलिसांची कारवाई
कल्याण - चार मकोकाअंतर्गत गुन्हे दाखल असलेला गुलाम उर्फ आब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी हा सात वर्षांपासून फरार होता. त्याला अखेर खडकपाडा पोलिसांनी काल त्याला आंबिवली इराणी वस्तीजवळ सापळा रचत अटक केली आहे. या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण परिसरातील आंबिवली इराणी वस्तीत राहणारा गुलाम उर्फ आब्बास मौसम इराणी उर्फ जाफरी याने काही दिवसांपूर्वी पत्नीसह सासूला मारहाण करून पळ काढला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास देखील सुरुवात केली होती. पोलिसांनी काल आंबिवली इराणी वस्तीजवळ सापळा रचून जाफरीला बेड्या ठोकल्या आहेत. जाफरीला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
मकोकाचा फरार आरोपी गजाआड; खडकपाडा पोलिसांची कारवाई https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2019