३० हून अधिक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मौलवीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 22:14 IST2018-07-27T21:29:39+5:302018-07-27T22:14:07+5:30

कात्रज येथील एका मदरशामधील घटना 

Maulvi is arrested for sexual harassment of more than 30 minor children | ३० हून अधिक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मौलवीला अटक

३० हून अधिक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मौलवीला अटक

पुणे - कोंढव्यात 30 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका मौलवीला ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील दोन पीडित मुलांनी बालहक्क समितीसमोर ही बाब सांगितल्यावर घटना उघडकीस आली.

ही घटना कात्रज येथील एका मदरशामध्ये घडली. या मदरशातील दोन दहा वर्षीय पिडीत मुले अत्याचाराला वैतागून पुणे स्टेशन येथे पळून आली होती. तेथे छोटी - मोठी कामे करुन ती राहत होती. दरम्यान बालहक्क कार्यकर्ता असलेल्या फिर्यादी डॉ.यामिनी अडबे यांनी त्यांना पाहिले. त्यांनी मुलांची चौकशी केली असता पीडित दहा वर्षाच्या दोन्ही मुलांनी ते जामीया अरबीया दारुल यतामा (आरके कॉलनी, कात्रज) येथे रहात असल्याचे आणि पंधरा दिवसांपूर्वी तेथून पळून आल्याचे सांगितले. पळून आल्याचे कारण विचारतात तेथील रहिम नावाचा मौलाना रात्री झोपताना मुलांसोबत अश्‍लील चाळे करत असल्याचे सांगितले. त्याला तसे करु न दिल्यास शिवीगाळ करुन काठीने मारहाण करत असल्याचेही सांगितले. या मुलांच्या जबाबाचे बालहक्क समितीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन फिर्यादीला फिर्याद देण्यास सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देवकाते तपास करत आहेत.


Web Title: Maulvi is arrested for sexual harassment of more than 30 minor children