PUBG वर जुळलं प्रेम, एका प्रेयसीवरून दोन प्रियकरांमध्ये झाला राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 21:35 IST2022-05-15T21:35:00+5:302022-05-15T21:35:40+5:30
Love flourished on pubg : येथे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला उत्तराखंडला आलेल्या दोन तरुणांमध्ये राडा झाला.

PUBG वर जुळलं प्रेम, एका प्रेयसीवरून दोन प्रियकरांमध्ये झाला राडा
फेसबुक, ईमेल आणि व्हाट्सअॅपवर मैत्री आणि प्रेम झाल्याचं तुम्ही खूपदा ऐकलं असेल. अशीच एक घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी भागात घडली आहे. येथे राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला उत्तराखंडला आलेल्या दोन तरुणांमध्ये राडा झाला.
दोन्ही तरुणांसोबत एकच तरुणी प्रेमाचा खेळ खेळत होती. तब्बल दोन वर्षांपूर्वी ऑनलाईन गेम खेळत असताना तिची मैत्री राजस्थानमधील तरुणासोबत झाली होती. त्यानंतर दोघेही एकत्रच पबजी गेम खेळू लागले. नंतर दोघांनी आपला मोबाईल नंबर शेअर केला आणि फोनवर बोलू लागले. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि नंतर भेटायचं ठरलं.
दरम्यान एक महिन्यापूर्वी ऑनलाईन खेळादरम्यान तरुणीचा मैत्री मुरादाबाद येथील एका तरुणासोबत झाली. या तरुणाच्याही ती प्रेमात पडली. तरुणीने मुरादाबादमधील तरुणाला भेटण्यासाठी हल्द्वानी येथे बोलावलं. शुक्रवारी दोघांना भेटायला तरुणी मल्ला गोरखपूर हल्द्वानी येथे पोहोचली. येथे पोहोचताच दोघेही तरुणीला आपली प्रेयसी असल्याचं सांगून आपापसात भांडू लागले. गोंधळ झाल्यानंतर कोणीतरी पोलिसांना याबाबत कळवले. पोलीस दोघांनाही ठाण्यात घेऊन गेले. येथे चौकशीदरम्यान सत्य उघडकीस आलं.
तरुणीने दोन्ही तरुणांना एकत्र का बोलावलं, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. ज्यावेळी दोन्ही तरुण भांडण करीत होते. त्यावेळी तरुणीही तेथे होती. त्यावेळी तिने राजस्थानमधील तरुणाला कानशिलात लगावली. तर महत्वाचे म्हणजे पबजी गेम खेळण्यात दोन्ही तरुण प्रोफेशनल लेव्हलचे खेळाडू आहेत. दोघांचा खेळ पाहून तरुणीही त्यांच्याकडे आकर्षित झाली. त्या दोघांशी खेळ खेळण्याशिवाय ती प्रेमाने बोलू लागली.