मारुती कारची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू तर एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 21:23 IST2021-09-06T21:22:11+5:302021-09-06T21:23:52+5:30
Accident : या घटनेत गंभीर जखमी झालेले गुलाबराव वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

मारुती कारची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू तर एक गंभीर
समुद्रपूर ( वर्धा) : तालुक्यातील नंदोरी - कोरा मार्गांवरील शेगाव (गोटाळे) शिवारात मारुती कारने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर सहकारी व्यक्ती गंभीर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. मृतक शेतकऱ्याचे गुलाबराव वैद्य (६०) आहे तर गंभीर जखमी झालेल्या सालगड्याचे गिरधर जुनघरे असे नाव आहे.
नंदोरी - कोरा मार्गांवरील शेगाव गोटाळे शिवारातील सुधाकर डुकरे यांच्या शेतालगत मारुती कार क्रमांक एम एच सी पि 1605 ने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी क्रमांक एम एच 32 एफ 3216 ने शेतातून घरी जातं होते. दरम्यान नंदोरी वरून करुळ येथे जाणाऱ्या मारोती व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेले गुलाबराव वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात असून पोलीस अधिक तपास करीत आहे.