बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:09 IST2025-10-01T14:08:45+5:302025-10-01T14:09:38+5:30
दोन वर्षांपूर्वी बाजारात गेलेल्या सुनेचा सांगाडा आता विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली.

फोटो - nbt
उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी बाजारात गेलेल्या सुनेचा सांगाडा आता विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली. राँग नंबरवरुन कॉल आल्यानंतर एका विवाहित महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध सुरू झाले होते. ती त्याच्यासोबत पळून गेली, परंतु आता तिचा मृतदेह आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
हरदोईच्या संडीला पोलीस स्टेशन परिसरात दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ३० वर्षीय सोनमच्या हत्येचं गूढ उकललं आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या समीदुल आणि त्याचे वडील अय्युब यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी मसीदुल अजूनही फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२३ रोजी गंगाराम यांनी त्यांची सून सोनमच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
सोनम बाजारात गेली होती आणि
तक्रारीत गंगाराम यांनी त्यांची सून सोनम बाजारात गेली होती आणि परत आली नाही असं म्हटलं होतं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. सुरुवातीला, पोलिसांना असं वाटलं की ही महिला तिच्या मर्जीने कोणासोबत तरी निघून गेली आहे. जून २०२५ मध्ये, तपास सीओ संदिला संतोष कुमार सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला.
सोनमला चुकून मसीदुलचा कॉल आला
सीओने तपास सुरू केला तेव्हा, सोनमचा शेवटचा कॉल माधोगंज पोलीस ठाण्याच्या परिसरातील जेहदीपूर येथील रहिवासी मसीदुलचा असल्याचं आढळून आलं. त्यानंतर, पोलिसांनी मसीदुलचा भाऊ समीदुल आणि वडील अयुब यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. सोनमला चुकून मसीदुलचा कॉल आला. यानंतर दोघेही वारंवार बोलू लागले. त्यांच्या संभाषणाचं रूपांतर हळूहळू प्रेमप्रकरणात झालं.
सोनमच्या हत्येचा रचला कट
सोनम घरातून पळून गेली. काही दिवस सर्व काही ठीक चालले, परंतु नंतर त्यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला. मसीदुलने सोनमच्या हत्येचा कट रचला, त्याच्या भावाने आणि वडिलांनी त्याला मदत केली. पोलीस चौकशीत दोघांनीही कबूल केलं की ८ ऑगस्ट २०२३ रोजी सोनमची हत्या केली होती आणि तिचा मृतदेह गावाबाहेरील कोरड्या विहिरीत फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.