The married woman's sharp throat slit with a sharp weapon; Police handcuffed her husband on suspicion | विवाहितेचा धारदार शस्त्राने चिरला गळा; पोलिसांनी संशयावरून पतीला ठोकल्या बेड्या

विवाहितेचा धारदार शस्त्राने चिरला गळा; पोलिसांनी संशयावरून पतीला ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देया खूनप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी पतीला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठरोडवरील अश्वमेधनगर पवार मळा परिसरात असलेल्या नाल्याजवळ मंगळवारी मध्यरात्री मोरे मळा हनुमानवाडी येथे राहणाऱ्या पूजा विनोद आखाडे या (22) विवाहितेचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने गळयावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या खूनप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी पतीला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

पूजा हिचा खून नेमका कोणी व का केला याचे कारण गुलदस्त्यात असून अनैतिक संबंधातून खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. काल मंगळवारी रात्री वाजेच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याचा अंदाज असून म्हसरूळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत मृत महिलेची ओळख पटलेली नव्हती काही वेळाने हनुमानवाडी मोरे मळ्यात राहणाऱ्या विनोद याने पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत पत्नी पूजा बेपत्ता असल्याबाबत माहिती दिली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. अश्वमेध नगर परिसरात महिलेच्या खुनाच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

Web Title: The married woman's sharp throat slit with a sharp weapon; Police handcuffed her husband on suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.