PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:56 IST2025-06-26T19:55:24+5:302025-06-26T19:56:10+5:30

त्रासलेल्या पतीने जीवाच्या सुरक्षिततेसाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवले.

Married woman fell in love with boy while playing PUBG; threatens husband to death | PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी

PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी

UP Crime: उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन गेम PUBG ने एका कुटुंबाला उद्ध्वस्त केले. ही घटना सिटी कोतवाली परिसरातील भाटीपुराची आहे. येथे राहणारा 30 वर्षीय शीलू रायकवार मिठाई बनवण्याचे काम करतो. शीलूचा विवाह 2022 मध्ये बांदा जिल्ह्यातील आराधनाशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच आराधनाला PUBG चे व्यसन लागले अन् गेम खेळता-खेळता तिची लुधियानातील शिवम नावाच्या तरुणाशी ओळख झाली.

विवाहित महिलेचे जडले प्रेम
शीलूने सांगितले की, तो दिवसभर दुकानात राहायचा, तर त्याची पत्नी घरी PUBG खेळायची. हळूहळू ती तिच्या पतीपासून दूर राहू लागली. तिने पतीसोबत भांडण सुरू केले. अनेकदा मुलाला मारुन खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. निष्पाप दीड वर्षीय मुलाच्या शरीरावर अजूनही जखमांच्या खुणा आहेत. त्याने पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आराधनाने त्याला जीवे मारण्याची आणि ५५ तुकडे करुन ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली.

यानंतर महिलेचा प्रियकर शिवम अचानक ९०० किमी अंतरावरुन तिच्या घरी पोहोचला, ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आराधनाने तिच्या प्रियकरासोबत जाण्याचा आग्रह धरला. यानंतर शीलूने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. शांतता भंग केल्याबद्दल पोलिसांनी शिवमला समज दिली. आराधनाने मात्र शेवटपर्यंत तिच्या नवऱ्याला सोडून शिवमसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अखेर त्रासलेल्या पतीने स्वतःच्या आणि मुलाच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवले. 

Web Title: Married woman fell in love with boy while playing PUBG; threatens husband to death