विवाहित प्रियकराने अपहरण करून केली प्रेयसीची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 01:13 PM2021-06-01T13:13:19+5:302021-06-01T13:15:11+5:30

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील ही घटना आहे. येथील २४ वर्षीय तरुणी तबस्सुमच तैमूर नावाच्या एका विवाहित तरूणाशी अफेअर सुरू होतं.

Married lover kidnapped and murdered his girlfriend in Muzaffarnagar Uttar Pradesh | विवाहित प्रियकराने अपहरण करून केली प्रेयसीची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

विवाहित प्रियकराने अपहरण करून केली प्रेयसीची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

googlenewsNext

प्रेमाच्या नावाखाली काही तरूण कशी तरूणींची फसवणूक करतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका विवाहित प्रियकराने त्याच्या प्रेयसीचं अपहरण करून तिची हत्या (Girlfriend kidnap and murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्याने हत्या करून प्रेयसीचा मृतदेह एका कालव्यात फेकून दिला होता. 

तरुणी घरातून गायब झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिचा तपास घेत असताना पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (हे पण वाचा : धक्कादायक! भांडणानंतर संतापलेल्या निर्दयी पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा...)

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील ही घटना आहे. येथील २४ वर्षीय तरुणी तबस्सुमच तैमूर नावाच्या एका विवाहित तरूणाशी अफेअर सुरू होतं. प्रियकर विवाहित असूनही तबस्सुम तैमूरवर लग्नासाठी दबाब आणत होती. यामुळे दोघांमध्ये नेहमीच या मुद्द्यावरून वाद होत होता. यातूनच प्रेयसीच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने प्रेयसीचं अपहरण केलं. त्यानंतर त्याने तिची निर्घृण हत्या केली. आरोपीने तबस्सुमचा मृतदेह एका कालव्यात फेकून दिला.

दुसरीकडे तबस्सुम घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. तिचं तैमूर नावाच्या विवाहित तरूणाशी अफेअर असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तैमूरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी तबस्सुमबाबत विचारणा केली. सुरुवातीला तैमूरने उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरूवात केली. (हे पण वाचा : “मामापासून वाचवा, आमच्या जीवाला धोका”; प्रेमविवाह केल्यानंतर BJP आमदाराच्या भाचीचा व्हिडीओ व्हायरल)

मात्र, पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर तबस्सुमचा मृतदेह एका कालव्यात फेकल्याची माहितीही त्याने दिली. तरूणीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्याने हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 

Web Title: Married lover kidnapped and murdered his girlfriend in Muzaffarnagar Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.