पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:21 IST2026-02-17T10:20:02+5:302026-02-17T10:21:27+5:30

सीए असलेल्या अंशुल धवन याने पोलिसांना कॉल केला आणि काही लोकांनी हल्ला केला आणि त्यांनी माझ्या पत्नीचा गळा चिरला, असे सांगितले. पण, तपासातून जे समोर समोर आले, ते धक्कादायक आहे. 

Married five months ago, CA husband slits pregnant banker wife's throat; Why did he kill her? | पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या?

पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या?

व्हॅलेंटाईन डे असल्याने तो पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी घरी आला. दोघांनी बराच वेळ सोबत घालवला आणि त्यानंतर निर्दयीपणे बँकर पत्नीची हत्या केली. ती गर्भवती होती. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने बनाव रचला. काही चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते आणि त्यांनी तिचा गळा चिरला. पण, १८ तासांतच सीए असलेल्या अंशुलचा बनाव उघडा पडला. कारण त्यानेच स्वतःच्या पत्नीची हत्या केली होती. 

रविवारी रात्रीचे ११ वाजले असतील. गुरुग्राममध्ये चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या अंशुल धवन याने पोलिसांना कॉल केला आणि सांगितले की, काही अज्ञात लोकांनी चोरीच्या उद्देशाने आमच्या हल्ला केला. माझ्या पत्नीचा गळा चिरला. 

पोलिसांनी अंशुलच्या सांगण्याप्रमाणे तपास सुरू केला. पण, प्रत्येकवेळी अंशुलच्या बोलण्यात विसंगती जाणवू लागली. तो सारखं गोष्टी बदलून सांगत होता. त्याला हल्लेखोरांचा चेहराही सांगता आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली. 

अंशुलने दिली हत्येची कबुली, पत्नीला का संपवलं?

पोलिसांनी अंशुललाच चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने पत्नीची हत्या आपणच केली अशी कबूली दिली. 

अंशुल गुरुग्राममध्ये सीए म्हणून काम करत होता. तर त्याची पत्नी महक ही झज्जरमधील बहादूरगडमध्ये घरी राहत होती. पत्नी बँकर होती आणि गर्भवती होती. पण, पत्नीच्या चारित्र्यावर अंशुलला संशय होता. त्यावरून त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणं सुरू होती. त्यातूनच त्याने महकची हत्या केली. 

अंशुलने आधी हातात ग्लोव्हज घालून तिचा गळा दाबला. त्यानंतर कात्रीने गळा कापून तिची हत्या केली. अंशुल आणि महकचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. २५ सप्टेंबर २०२५ रोजी लग्न झाले. महक गुरुग्राममध्येच एचडीएफसी बँकेत नोकरीला होती.

Web Title : गर्भवती बैंकर पत्नी की सीए पति ने हत्या की; चरित्र पर शक!

Web Summary : गुरुग्राम के सीए अंशुल धवन ने अपनी गर्भवती बैंकर पत्नी महक की हत्या कर दी, उसे चरित्र पर शक था। पहले चोरी का नाटक किया, लेकिन पुलिस पूछताछ में कबूल कर लिया। पांच महीने पहले शादी हुई थी; शक से तनाव बढ़ गया था।

Web Title : CA Husband Murders Pregnant Banker Wife; Doubted Her Character.

Web Summary : Gurugram CA Anshul Dhawan murdered his pregnant banker wife, Mahak, suspecting infidelity. He initially staged a robbery but confessed under police questioning. The couple married five months prior; tensions arose from his suspicions leading to the brutal act.