ऑनलाईन प्रेम नंतर लग्न; पत्नीला सोडून छूमंतर होणाऱ्या पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 19:20 IST2021-11-28T19:18:56+5:302021-11-28T19:20:37+5:30
Fraud Case : ती ६ महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी ऑनलाइन भेटली, त्यानंतर दोघांमध्ये सतत बोलणे सुरू झाले. घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केले.

ऑनलाईन प्रेम नंतर लग्न; पत्नीला सोडून छूमंतर होणाऱ्या पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
हरियाणातील सिरसा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नवविवाहित वधूला सोडून नवरा कॅनडाला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी वेळीच आरोपी नवऱ्याला अटक केली आहे.
खरंतर, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा एका तरुणीने सिरसाच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार देताना सांगितले की, ती ६ महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी ऑनलाइन भेटली, त्यानंतर दोघांमध्ये सतत बोलणे सुरू झाले. घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केले.
३० लाखांची मागणी केली असता संशय निर्माण झाला
तक्रारीत तरुणीने पुढे सांगितले की, १८ नोव्हेंबर रोजी हा तरुण सिरसा येथे आला, त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचे लग्न पार पडलं. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून त्याच्याकडे ३० लाखांची मागणी केली असता संशय आला. तरुण व त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी सिरसा पोलिसात तक्रार दाखल केली.
सिरसा सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचे प्रभारी रामनिवास यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा सिरसाच्या न्यू हाउसिंग बोर्डमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने कुटुंबासह सिरसा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करत सिरसा सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनने एक टीम दिल्ली विमानतळावर रवाना केली. आरोपी तरुण साहिल खुराणा याला विमानतळावरून अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची ६ महिन्यांपूर्वी ऑनलाइन भेट झाली होती, त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीनुसार लग्न झाले. लग्न झाल्या झुळूक सासरच्यांनी तिच्याकडे ३० लाखांची मागणी केल्याचा आरोप तरुणीने केला असून याप्रकरणी तरुणासह त्याचे आई-वडील, भाऊ, भावोजीआणि बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.