पिंपरीत मतिमंद तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 16:31 IST2019-03-23T16:31:13+5:302019-03-23T16:31:58+5:30
पीडित तरुणीला मानसोपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, आरोपी कोणाचीही परवानगी न घेता, कोणालाही न कळवता तरुणीवर उपचार करीत असलेल्या रूममध्ये शिरला...

पिंपरीत मतिमंद तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : मतिमंद तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रुग्णालयातील वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास चिंचवड येथील आस्था रुग्णालयात घडली.
प्रवीण मगन जाधव (वय २६, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणीला मानसोपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, आरोपी कोणाचीही परवानगी न घेता, कोणालाही न कळवता तरुणीवर उपचार करीत असलेल्या रूममध्ये शिरला. तरुणी मतिमंद असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.