अबब...'दीप्ती डायमंड्स' नावाचं दुकान थाटून घातला ७ कोटींचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 18:10 IST2018-07-24T18:03:25+5:302018-07-24T18:10:45+5:30

७ कोटींचा १५ हिरे व्यापाऱ्यांना चोरट्याने घातला गंडा 

A man has open 'Dipti Diamonds' named shop and bluff 7 crores | अबब...'दीप्ती डायमंड्स' नावाचं दुकान थाटून घातला ७ कोटींचा गंडा 

अबब...'दीप्ती डायमंड्स' नावाचं दुकान थाटून घातला ७ कोटींचा गंडा 

मुंबई - वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी) १५ हिरे व्यापाऱ्यांना ७ कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. बीकेसी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी  शनिवारी आरोपी चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सिद्धार्थ (वय - ३४) असं या चोराचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील रहिवासी असून तो वाणिज्य शाखेतील पदवीधर आहे. सिद्धार्थचे बीकेसी येथे ‘दीप्ती डायमंड्स’ नावाचं एक भाड्याचं दुकान आहे. त्याने १५ हिरे व्यापाऱ्यांकडून ७ कोटींचे हिरे खरेदी केले होते. मात्र, त्याचे पैसे न देताच सिद्धार्थने बीकेसी येथील दुकान बंद करून पळ काढला होता.

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हिरे व्यापाऱ्यांनी सिद्धार्थविरोधा बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर फब्रुवारीपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यांनी सिद्धार्थची सर्व बँक खाती सील केली होती. अखेरीस शनिवारी घरच्यांशी बोलण्यासाठी जेव्हा सिद्धार्थने स्वत:चा फोन सुरू केला, त्यावेळी त्याच्या फोनच्या लोकेशनवरून त्याचा शोध घेतला गेला आणि पोलिसांनी त्याला पकडले आहे.

Web Title: A man has open 'Dipti Diamonds' named shop and bluff 7 crores