Man got life imprisonment and pecuniary penalty for lady murder in Tonk | पती आणि ३ मुलांना सोडून आली होती महिला, तरी प्रियकराने विष देऊन मारलं, जाणून घ्या का..

पती आणि ३ मुलांना सोडून आली होती महिला, तरी प्रियकराने विष देऊन मारलं, जाणून घ्या का..

टोंक जिल्ह्यातील तीन वर्षाआधी झालेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी प्रियकराला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला १० हजार रूपये दंडही ठोठावण्यात आला आहे. ही विवाहित महिला पती आणि आपली तीन मुले सोडून आठ महिन्यांआधी प्रियकरासोबत राहून लागली होती. मात्र, प्रियकराने तिचा पिच्छा सोडवण्यासाठी तिला विष देऊन बस स्टॅंडवर सोडून फरार झाला होता. नंतर मृत्यूआधी महिलेने जबाबात प्रियकराने विष दिल्याचं सांगितलं होतं.

जिल्हा आणि सेशन न्यायाधीश अजय शर्माने विवाहितेला विष देऊन मारण्याप्रकरणी प्रियकराला जन्मठेपेची आणि आर्थिक शिक्षा सुनावली आहे. २३ डिसेंबर २०१७ ला टोंक पोलीस स्टेशन परिसरातील बस स्टॅंडवर एक महिला पडलेली आढळून आली होती. पोलिसांनी या महिलेला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तेव्हा उषा प्रजापत या महिलेने प्रियकर विक्रम सिंह याने विष दिल्याचा खुलासा केला होता. त्याच रात्री तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती आणि विक्रम सिंह याला अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टाने जन्मठेपेची आणि १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विवाहित महिला घटनेच्या आठ महिन्यांआधी सासर सोडून आणि तीन लेकरांना सोडून प्रियकरासोबत राहत होती. पण त्याला नंतर तिचा कंटाळा आला. घटनेच्या दिवशी दोघेही टोंकहून जयपूरला जाण्यासाठी निघाले होते. पण आरोपी प्रियकराने तिला विष दिलं आणि बस स्टॅंडवर सोडून फरार झाला होता.
 

Web Title: Man got life imprisonment and pecuniary penalty for lady murder in Tonk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.