बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला जिवंत जाळलं, मित्रानेच फोन करून विटांच्या भट्टीवर बोलवलं होतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 12:53 IST2021-02-02T12:48:10+5:302021-02-02T12:53:54+5:30

अमितच्या वडिलांनी सून आणि तिच्या वडिलांसहीत ३ लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत सांगितले की, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

UP man dies after being set on fire by wife and her boyfriend in Kasganj | बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला जिवंत जाळलं, मित्रानेच फोन करून विटांच्या भट्टीवर बोलवलं होतं...

बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला जिवंत जाळलं, मित्रानेच फोन करून विटांच्या भट्टीवर बोलवलं होतं...

उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातून एका महिलेने कथितपणे आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, कासगंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने कथितपणे आपल्या बॉयफ्रेन्डच्या मदतीने जिवंत जाळलं. यात २५ वर्षीय अमित कुमार नावाच्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमितच्या वडिलांनी सून आणि तिच्या वडिलांसहीत ३ लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत सांगितले की, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अमितचे वडील सुरेश चंद यांनी संपूर्ण घटना सांगितली. ते म्हणाले की, त्यांच्या सूनेचे स्थानिक राकेश नावाच्या तरूणासोबत अनैतिक संबंध होते. ते म्हणाले की, 'अमितचा मित्र हेमंत जो राकेशचाही मित्र आहे. त्याने शनिवारी अमितला फोन करून आपल्या जवळच्या विटाच्या भट्टीवर बोलवलं होतं. नंतर अमित तिथे बेशुद्ध आढळून आला. तिथेच त्याला जाळण्यात आलं होतं'. अमितच्या वडिलांनी दावा केला आहे की, हेमंत आणि राकेशसोबत मिळून त्यांची सून संगीताने अमितला बांधलं आणि त्याच्या शरीरावर डीझेल टाकून त्याला जाळलं. ( हे पण वाचा : खरी ओळख लपवून ३१ वर्षीय महिलेचं १४ महिने लैंगिक शोषण, २३ वर्षीय आरोपीला अटक...)

अमितच्या वडिलांनी संगीताच्या वडिलांवर गंभीर आरोप लावले. ते म्हणाले की, 'संगीताचा वडील राम स्वरूमही माझ्या मुलाच्या हत्येत सामिल आहे'. एडिशनल पोलीस सुपरटेंडेंट आदित्य शर्मा म्हणाले की, 'अमितच्या वडिलांकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर संगीता, हेमंत जाटव, राकेश आणि राम स्वरूप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 

Web Title: UP man dies after being set on fire by wife and her boyfriend in Kasganj