खरी ओळख लपवून ३१ वर्षीय महिलेचं १४ महिने लैंगिक शोषण, २३ वर्षीय आरोपीला अटक...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 10:03 AM2021-02-02T10:03:41+5:302021-02-02T10:04:05+5:30

पीडित महिलेने तक्रार देताना सांगितले की, आरोपी तरूणी एक इलेक्ट्रीशिअन आहे. तो या महिलेच्या घरी काम करण्यासाठी आला होता.

Gujarat Ahmedabad woman rape video accused arrested police crime | खरी ओळख लपवून ३१ वर्षीय महिलेचं १४ महिने लैंगिक शोषण, २३ वर्षीय आरोपीला अटक...

खरी ओळख लपवून ३१ वर्षीय महिलेचं १४ महिने लैंगिक शोषण, २३ वर्षीय आरोपीला अटक...

Next

गुजरातच्याअहमदाबाद शहरात पोलिसांनी ३१ वर्षीय महिलेसोबत बलात्काराच्या आरोपात एका २३ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. आरोपीने आपली ओळख लपवून महिलेसोबत मैत्री केली आणि नंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. यादरम्यान त्याने महिलेचे अश्लील व्हिडीओही रेकॉर्ड केले. गेल्या १४ महिन्यांपासून ते नात्यात होते. आता महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

पीडित महिलेने तक्रार देताना सांगितले की, आरोपी तरूणी एक इलेक्ट्रीशिअन आहे. तो या महिलेच्या घरी काम करण्यासाठी आला होता. तेव्हापासूनच दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि दोघांची मैत्री झाली. आरोपीने महिलेला त्याचं नाव  पिंटू सांगितलं होतं. महिलेने सांगितले की, तिला वाटले की तो तरूणी तिच्याच धर्माचा आहे. (हे पण वाचा : बलात्काराची खोटी तक्रार करणं महागात, भरावा लागणार 'इतका' दंड )

त्यानंतर दोघांची मैत्री चांगलीच वाढली. दोघे प्रेमात पडले. नंतर विषय शारीरिक संबंधापर्यंत पोहोचला. तरूणी महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जात होता. तिच्यासोबत सतत शारीरिक संबंध ठेवत राहिला. एक दिवस महिलेला समजले की, तिच्या प्रियकराचं नाव रमझान धांची आहे. तो दुसऱ्या धर्माचा आहे. ही समजल्यावर ती हैराण झाली.

यानंतर महिलेने तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दिली. महिलेनुसार, ते दोघे १४ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान ते दोघे सांणद, चोटीला, जूनागढ सारख्या ठिकाणांवर फिरत होते. महिलेने तरूणावर मारझोड केल्याचाही आरोप लावला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अहमदाबादच्या जुहापुरामधून अटक केली आहे.
 

Web Title: Gujarat Ahmedabad woman rape video accused arrested police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.