रेप करू शकला नाही म्हणून चावला त्याने महिलेचा कान, नंतर केला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 12:23 IST2021-09-03T12:22:23+5:302021-09-03T12:23:02+5:30

आरोपी पीडित विधवा महिलेच्या शेजारीच राहतो आणि तिच्या नात्यात लागतो. इतकंच नाही तर आरोपीने महिलेच्या डोक्यावर दगडाने हल्लाही केला.

Man chewed the Woman's ear and tried to rape in Chitrakoot UP | रेप करू शकला नाही म्हणून चावला त्याने महिलेचा कान, नंतर केला धक्कादायक प्रकार

रेप करू शकला नाही म्हणून चावला त्याने महिलेचा कान, नंतर केला धक्कादायक प्रकार

उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधून नात्यांना काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने आपल्या नातेवाईक महिलेवर रेप करण्याचा  प्रयत्न केला आणि जेव्हा तो रेप करू शकला नाही तेव्हा त्याने  महिलेचा कान दातांनी चावला. आरोपी पीडित विधवा महिलेच्या शेजारीच राहतो आणि तिच्या नात्यात लागतो. इतकंच नाही तर आरोपीने महिलेच्या डोक्यावर दगडाने हल्लाही केला. ज्यानंतर महिला जखमी होऊन बेशुद्ध पडली. मग आरोपी फरार झाला.

महिलेचा नातेवाईक आहे तरूण

मीडिया रिपोर्टनुसार आरोपी अशोक पटेल विधवा महिलेच्या शेजारीच राहतो. तो गेल्या वर्षभरापासून सतत महिलेला कधी घरी येऊन तर कधी फोन करून त्रास देत होता. तो महिलेचा नातेवाईक असल्याने महिलाही त्याची तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करत होती. हेच महिलेला महागात पडलं आणि आरोपीची हिंमत वाढत गेली. त्याच्या मनात येईल तेव्हा तो महिलेला फोन करून त्रास देत होता. (हे पण वाचा : अल्पवयीन पीडित मुलीवर केला अत्याचार; त्यांनतर तिच्या दोन बहिणींचेही केले लैंगिक शोषण)

कान चावला

बुधवारी रात्री आरोपी जबरदस्ती महिलेच्या घरात शिरला आणि तिच्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. यादरम्यान महिलेने त्याला विरोध केला म्हणून आरोपी चिडला आणि त्याने महिलेला मारहाण करत तिचा कान चावला. ज्यामुळे महिला रक्तबंबाळ झाली.  त्यानंतर आरोपीने महिलेवर दगडाने हल्ला केला. महिला यात गंभीर जखमी झाली.

पोलीस म्हणाले आधीपासून आहे संबंध

या घटनेची माहिती मिळताच शेजारी लोकांनी महिलेला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. जिल्हा हॉस्पिटलमध्ये महिलेवर उपचार सुरू आहेत आणि तिची स्थिती स्थीर आहे. आरोपी विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनुसार, आरोपी आणि महिलेले आधीापासून संबंध होते आणि बुधवारी रात्री काही कारणावरून त्यांचं भांडण झालं आणि त्यानंतर हा वाद इतका वाढला.
 

Web Title: Man chewed the Woman's ear and tried to rape in Chitrakoot UP