घराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 21:52 IST2021-12-30T21:51:23+5:302021-12-30T21:52:05+5:30
Sexual Abuse : या घटनेमुळे भेदरलेली चिमुरडी दोन दिवस विनमयस्क अवस्थेत रहात होती.यामुळे चलबिचल झालेल्या तीच्या आईने तिची अस्थेने चौकशी केली असता तिने झालेली घटना तीच्या आईला सांगितली.

घराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक
मुंब्राः घराजवळ खेळत असलेल्या सात वर्षाच्या चिमुरड्या मुलीला खेळण्यासाठी घरात बोलवून तीच्यावर दोन दिवस लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना मुंब्र्यात उघडकीस आली.
या घटनेमुळे भेदरलेली चिमुरडी दोन दिवस विनमयस्क अवस्थेत रहात होती.यामुळे चलबिचल झालेल्या तीच्या आईने तिची अस्थेने चौकशी केली असता तिने झालेली घटना तीच्या आईला सांगितली. याबाबत तिच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरुन अत्याचार केलेल्या जुबेर शेख (वय ३९) याला मुंब्रापोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे आणि त्यांच्या पथकाने अटक केली. मूळ कर्नाटकमधील यादगीर येथे रहाणारा शेख १५ दिवसांपूर्वी मुंब्र्यातील उदय नगर येथे रहाण्यासाठी आला होता.कौटुंबिक वादामुळे त्याच्या पत्नीने त्याच्यावर मूळगावी दाखल केलेल्या तक्रारी संदर्भात ती मूळगावी गेली आहे.यामुळे सध्या तो घरात एकटा रहात होता.