विद्यार्थिनीशी अश्लील संभाषण करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:53 IST2019-09-25T14:30:44+5:302019-09-25T14:53:47+5:30
फोन नंबरच्या आधारे वनराई पोलिसांनी त्याला अटक केली.

विद्यार्थिनीशी अश्लील संभाषण करणाऱ्यास अटक
मुंबई - विद्यार्थीला फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्या गणेश टिकटे (३५) याला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा अर्ज भरून देण्याच्या बहाण्याने त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळविल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झाले आहे. गणेश साकीनाका परिसरात राहणार असून अंधेरीतील एका हॉटेलमध्ये काम करतो. विद्यार्थिनी महाविद्यालयाचा अर्ज भरताना गणेश तिथे आला आणि तिचा मोबाईल क्रमांक नकळत लिहून घेतला. त्यांनतर तिला फोन करून त्याने अश्लील संभाषण करण्यास सुरुवात केल्यानंतर तिने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फोन नंबरच्या आधारे वनराई पोलिसांनी त्याला अटक केली.