Raj Thackeray : राज ठाकरेंवर मोठी कारवाई, औरंगाबादेत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 15:09 IST2022-05-03T14:44:41+5:302022-05-03T15:09:16+5:30

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत तीन अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Major action taken against Raj Thackeray, case filed in Aurangabad | Raj Thackeray : राज ठाकरेंवर मोठी कारवाई, औरंगाबादेत गुन्हा दाखल

Raj Thackeray : राज ठाकरेंवर मोठी कारवाई, औरंगाबादेत गुन्हा दाखल

औरंगाबादमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भोंग्याप्रकरणी दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना आता महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत 12 अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून औरंगाबाद पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्याआधी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या या अटी किंवा नियमांचं पालन झाल नाही तर पोलीस कारवाई करतील, असा इशाराही देण्यात आला नाही. 

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात; औरंगाबाद पोलीस एक्शनमोडमध्ये

रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. तसेच सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचं पालन झालं कशाचं उल्लंघन झालं, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात येणार होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांतर्फे राज ठाकरे तसेच आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. अखेर आज ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

Web Title: Major action taken against Raj Thackeray, case filed in Aurangabad