मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:32 IST2020-07-17T14:26:11+5:302020-07-17T14:32:06+5:30

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील नखतरणा तालुक्यातील नारा पोलीस  ठाण्यात या मदरशा शिक्षक मौलाना समसुद्दीन हाजी सुलेमान जाटविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Madrasa teacher rapes student for four years; Now the crime has been filed | मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

ठळक मुद्दे  या तक्रारीत पीडितेने सांगितले की जेव्हा ती १५ वर्षांची होती, तेव्हा तिला उर्दू आणि अरबी शिकण्यासाठी मदरशामध्ये पाठवले गेले. मौलानाने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन आणि बलात्काराचा व्हिडिओ लिक करण्याची धमकी देत चार वर्षे लैंगिक अत्याचार केले.

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मदरसा शिक्षक मौलाना समसुद्दीन हाजी सुलेमान जाट याला पोलिसांनी अटक केली आहे. या मदरशा शिक्षकाने चार वर्षांपासून एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. १९ वर्षीय बलात्कार पीडित मुलीचे नुकतेच लग्न झाले होते. आरोपीच्या मौलानाविरोधात तिच्या नवऱ्याने मुलीला बलात्काराची तक्रार दाखल करण्यास प्रोत्साहित केले.

वृत्तानुसार पीडित मुलीची शारीरिक तपासणी केल्याने लैंगिक छळाचे पुरावे सापडले आहेत. पोलिसांनी आरोपी मदरसा शिक्षक समसुद्दीन हाजी सुलेमान जाट याला अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील नखतरणा तालुक्यातील नारा पोलीस  ठाण्यात या मदरशा शिक्षक मौलाना समसुद्दीन हाजी सुलेमान जाटविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.


 या तक्रारीत पीडितेने सांगितले की जेव्हा ती १५ वर्षांची होती, तेव्हा तिला उर्दू आणि अरबी शिकण्यासाठी मदरशामध्ये पाठवले गेले. आपल्यासोबत झालेल्या दुष्कर्माचे वर्णन करीत पीडित मुलगी म्हणाली की, २०१५ मध्ये एक दिवस आरोपी मौलानाने त्याला कपडे धुण्यासाठी दिले आणि वर्ग संपल्यानंतर त्याला बाथरूममध्ये पाठवले. मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “मौलानाने मागून येऊन माझ्यावर बलात्कार केला. त्याने मला या घटनेबद्दल कोणालाही काहीही सांगू नकोस अशी धमकी दिली, नाहीतर तो माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करेल. त्यानंतर मौलानाने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन आणि बलात्काराचा व्हिडिओ लिक करण्याची धमकी देत चार वर्षे लैंगिक अत्याचार केले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

ताई मला वाचव!  हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...

 

हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

Web Title: Madrasa teacher rapes student for four years; Now the crime has been filed