ऑनर किलिंग! ​​​​​​​प्रेमविवाहामुळे संतापलेल्या बापाचा आई झालेल्या मुलीवर बलात्कार, गळा दाबून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 04:05 PM2021-11-16T16:05:05+5:302021-11-16T16:06:43+5:30

यासंदर्भात, पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, मृत महिलेने गेल्या वर्षापूर्वी प्रेम विवाह केल्याचे समोर आले, यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त होते. 

Madhya pradesh Father was angry with daughter's love marriage killed her after rape | ऑनर किलिंग! ​​​​​​​प्रेमविवाहामुळे संतापलेल्या बापाचा आई झालेल्या मुलीवर बलात्कार, गळा दाबून केली हत्या

ऑनर किलिंग! ​​​​​​​प्रेमविवाहामुळे संतापलेल्या बापाचा आई झालेल्या मुलीवर बलात्कार, गळा दाबून केली हत्या

Next

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील समसगड जंगलात एक महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला. यानंतर, पोलिसांनी धक्कादाक खुलासा केला आहे. संबंधित महिलेचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता आणि हा बलात्कार करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून खुद्द तिचा बापच होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

रातीबड टीआय सुदेश तिवारी यांनी म्हटले आहे, की दोन दिवसांपूर्वी समसगडच्या जंगलात एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, हा मृतदेह सिहोर जिल्ह्यातील बिल्किसगंज येथील महिलेचा असल्याचे आणि संबंधित मृत मुलगा तिचा मुलगा असल्याचे समोर आले.

यासंदर्भात, पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, मृत महिलेने गेल्या वर्षापूर्वी प्रेम विवाह केल्याचे समोर आले, यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त होते. 

बलात्कारानंतर महिलेची हत्या -
यासंदर्भात पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता वडिलांचा संशय आला. यानंतर कसून चौकशी केल्यानंतर वडिलांनी गुन्ह्या कबूल केला. तिवारी यांनी सांगितल्यानुसार, चौकशीत आरोपी वडिलांनी म्हटले आहे, की त्यांच्या मुलीने लव्ह मॅरीज केले होते. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने गावातील लोक टोमने मारत होते. 

संबंधित मुलगी लग्नापासून घरी आलीच नव्हती. मात्र, या दिवाळीला ती त्याच्या (आरोपीच्या) मोठ्या मुलीसोबत घरी आली होती. यातच तिच्या 8 महिन्याच्या मुलाचा आजाराने मृत्यू झाला. या सर्व दुःखाच्या परिस्थितीत मोठ्या मुलीने तिच्या वडिलांना फोन करून याची माहिती दिली. यानंतर तिचे वडील आपल्या मुलाला घेऊन रातीबड येथे पोहोचले आणि संबंधीत चिमुकल्याचा मृतदेह दफन करण्यासाठी ते मुलीला घेऊन समसगडच्या जंगलात गेले. येथेच त्यांचा मुलीसोबत प्रेम विवाहावरून वाद झाला. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. आरोपी बापावर आयपीसी कलम 302, 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

 

Web Title: Madhya pradesh Father was angry with daughter's love marriage killed her after rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app