शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसाठी 1100 Km प्रवास केला; महिन्याभरानंतर पोलिसांना तरुणाचा सांगाडा सापडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:38 IST

त्या तरुणासोबत नेमकं काय घडलं, जाणून घ्या...

Crime News: पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणाने आपल्या सोशल मीडियावरील गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी कॅब बुक केली आणि 1100 किलोमीटरचा प्रवास करुन मिदनापूर गाठले. तिथे पोहचताच तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पोलिसांना एका महिन्यानंतर त्या तरुणाचा सांगाडा सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा गजेंद्र चौधरी (18 वर्षे) याच्या वडिलांनी 8 ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात आपल्या मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. गजेंद्र चौधरी पश्चिम बंगालमध्ये गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. गजेंद्रच्या कुटुंबीयांनी कॅब चालक अनिकेत सोळंकीवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी अनिकेतची चौकशी केली असता, त्याने घडलेली संपूर्ण घटना सांगितली.

त्या दिवशी काय घडले?कॅब चालकाने पोलिसांना सांगितले की, तो गजेंद्र चौधरीसोबत छिंदवाडा येथून पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात गेला होता. तिथे जाताच गजेंद्र त्याच्या सोशल मीडियावरील ग्रलफ्रेंडला भेटला. पण, तिच्या घरच्यांनी गजेंद्रला बेदम मारहाण केली आणि जखमी अवस्थेत माझ्या ताब्यात दिले. मी त्याच्याबरोबर निघालो, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घाबरुन मी गजेंद्रचा मृतदेह जंगलात फेकून दिला.

चालकाच्या कबुलीनंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांचे पथक पश्चिम बंगालला पोहोचले. चालक अनिकेतच्या सांगण्यावरुन मिदनापूर पोलिसांच्या मदतीने गजेंद्रच्या मृतदेहाचा जंगलात शोध घेतला असता त्याचा सांगाडा सापडला. जवळच पोलिसांना मृताचे बूट आणि घड्याळ सापडले. यावरुन गजेंद्रच्या कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली. आता याप्रकरणी तरुणीच्या घरच्यांवर कारवाई होणार आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी