भांडण सोडवायला गेले होते पोलीस, महिलेने दातांनी पाडला पोलिसाच्या कानाचा तुकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 12:46 PM2021-12-10T12:46:00+5:302021-12-10T12:46:11+5:30

lucknow Crime News : लखनौच्या ठाकूरगंज भागात दोन गटात हाणामारीची सूचना मिळताच पोलीस शिपाई राहुल कुमार श्रीवास्तव काही पोलिसांसोबत घटनास्थळी पोहोचला.

UP : Lucknow mutual dispute quarrel attack constable ear bitten injured | भांडण सोडवायला गेले होते पोलीस, महिलेने दातांनी पाडला पोलिसाच्या कानाचा तुकडा

भांडण सोडवायला गेले होते पोलीस, महिलेने दातांनी पाडला पोलिसाच्या कानाचा तुकडा

googlenewsNext

लखनौमधून (lucknow) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे दोन पक्षांमध्ये होत असलेलं भांडण सोडवण्यासाठी पोलीस गेले होते. त्यातील एक पोलिसावर दाम्पत्य तुटून पडलं आणि महिलेने पोलिसाचा कान दातांना चावून वेगळा. रक्तबंबाळ झालेल्या पोलिसाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत. 

लखनौच्या ठाकूरगंज भागात दोन गटात हाणामारीची सूचना मिळताच पोलीस शिपाई राहुल कुमार श्रीवास्तव काही पोलिसांसोबत घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी तिथे चांगलाच वाद सुरू होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना दोन गटांना शांत कऱण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, दोन गटातील लोक काही एक ऐकायला तयार नव्हते. शेजारी शैलेंद्र सिंहचं भांडण कमलेश यादवची पत्नी नीतू यादव सोबत सुरू होतं. अशात कमलेश यादव चाकू घेऊन शैलेंद्रच्या परिवाराकडे धावून गेला शिपाई राहुलने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडून चाकू घेतला. यावरून कमलेश यादव आणि त्याची पत्नी शिपायांवर भडकले. त्यानंतर ते शिपायासोबत भिडले.

यावेळी नीतूने शिपाई राहुलच्या कानाचा दातांनी तुकडा पाडला. यानंतर शिपायाने पोलीस स्टेशनकडे आणखी मदत मागितली. दुसरी टीम आल्यावर रक्ताने माखलेल्या शिपायाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पोलिसावर हल्ला कऱण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई केली जात आहे.  
 

Web Title: UP : Lucknow mutual dispute quarrel attack constable ear bitten injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.