ऑनलाईन मैत्रीनंतर बहरले प्रेम, नंतर न्यूड व्हिडीओ अन् ब्लॅकमेलिंग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 18:49 IST2022-01-09T18:48:55+5:302022-01-09T18:49:50+5:30
Nude Video And Blackmailing : प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षाची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. रितिक मिश्रा नामक आरोपी सोबत तिची गेल्यावर्षी स्नॅप चॅटवर ओळख झाली होती.

ऑनलाईन मैत्रीनंतर बहरले प्रेम, नंतर न्यूड व्हिडीओ अन् ब्लॅकमेलिंग सुरु
नागपूर : बारावीतील एका विद्यार्थिनीने स्नॅप चॅट वर एका तरुणाशी मैत्री केली. तो कुठला आहे, कसा आहे, याचा आतापता नसताना त्यांची मैत्री झाली अन् मैत्रीनंतर त्यांच्यातील ऑनलाइन प्रेमही बहरले. ते एवढे पुढे गेले की तिने त्याला आपले न्यूड व्हिडिओ पाठवले. आता त्याचे काम संपले अन् तिची डोकेदुखी वाढली. तिचे हेच व्हिडिओ आता तिच्यासाठी अस्वस्थतेचे कारण ठरले आहे.
प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षाची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. रितिक मिश्रा नामक आरोपी सोबत तिची गेल्यावर्षी स्नॅप चॅटवर ओळख झाली होती. नंतर या दोघांचे ऑनलाइन प्रेम प्रकरण बहरले. ते सलग एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. तिने त्याला स्वतःचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर त्याची डिमांड वाढतच गेली. त्यामुळे युवतीने त्याला टाळने सुरु केले. त्यामुळे आरोपी रितिक ब्लॅकमेलिंगवर उतरला. ते पाहून तिने त्याच्याशी बातचीत बंद केली, त्याला ब्लॉक केले. त्यामुळे तो खवळला. आरोपी रीतीकने तिच्या मोबाईलमधील संपर्कात असलेले सर्व नंबर काढून त्यातील एका जवळच्या व्यक्तीला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले. त्याला फोन करून तिला बोलायला सांग, नाही तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. नातेवाइकांने हा व्हिडीओ तिला दाखवून विचारणा याबाबत केली. तिच्या आई वडिलांनाही हा प्रकार सांगितला. प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे युवतीने माणकापुर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवली. ठाणेदार वैयंती मांडवधरे यांनी आरोपी रितिकविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
आरोपी ओडिशातील रहिवासी
पोलिसांनी आरोपीच्या आयपी वरून त्याचा एड्रेस शोधला असता तो ओडिशा मधील रहिवासी असल्याचे उघड झाले. त्याचा शोध घेतला जात आहे.