शिक्षकाच्या प्रेमात वेडी झाली 'ती'; नवऱ्याचा झोपेतच काढला काटा, सुखी संसाराचा भयानक शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:51 IST2026-03-23T15:51:04+5:302026-03-23T15:51:42+5:30

शिक्षक अमराराम आणि अनु यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. 

love betrayal and murder love with teacher wife murder husband | शिक्षकाच्या प्रेमात वेडी झाली 'ती'; नवऱ्याचा झोपेतच काढला काटा, सुखी संसाराचा भयानक शेवट

फोटो - ndtv.in

बालोतरा जिल्ह्यातील गिडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मलवा गावात एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शिक्षक अमराराम आणि अनु यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मलवा गोयलान येथील रहिवासी महेंद्र कुमार (वय २१ वर्ष) याचं लग्न ३ वर्षांपूर्वी बागुंडी येथील अनु देवी हिच्याशी झालं होतं. मात्र, अनु या लग्नामुळे आनंदी नव्हती आणि त्यांच्यात सतत वाद व्हायचे. लग्नानंतर ती बहुतेक वेळ आपल्या माहेरीच राहायची. याच दरम्यान तिचा संपर्क टिळवाडा येथील रहिवासी असलेल्या अमराराम या शिक्षकाशी झाला. अमराराम सध्या एका सरकारी शाळेत कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते.

पतीसोबत रोज व्हायचं भांडण

लग्नानंतर अनु आणि तिच्या पतीमध्ये दररोज कडाक्याची भांडणं होत होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी अनेकदा पंचायतही भरवण्यात आली आणि दोघांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर अनु सासरी परतली, पण अवघ्या दोन दिवसांतच तिने रात्री आपल्या बॉयफ्रेंडला फोन करून बोलावून घेतलं.

पतीचा काढला काटा

महेंद्र झोपेत असताना अनु आणि अमराराम या दोघांनी मिळून त्याचा गळा दाबून खून केला. सकाळी बराच वेळ झाला तरी महेंद्र उठला नाही, तेव्हा त्याच्या आईने जाऊन पाहिलं असता त्याचं शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं. महेंद्रच्या शरीरावर आणि गळ्यावर काही खुणा पाहून कुटुंबीयांचा संशय बळावला. त्यानंतर त्याच्या भावाने तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.
 

Web Title: love betrayal and murder love with teacher wife murder husband