लोकलच्या गर्दीची बळी; विद्यार्थिनीचा तोल गेला आणि पडून जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 21:17 IST2018-12-14T21:16:42+5:302018-12-14T21:17:59+5:30
गर्दीमुळे दारातच अडकलेल्या संजना सुरडकर या विद्यार्थिनीचा तोल गेला आणि लोकलमधून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकलच्या गर्दीची बळी; विद्यार्थिनीचा तोल गेला आणि पडून जागीच मृत्यू
उल्हासनगर - लोकलमधील गर्दीने काल एका विद्यार्थीचा बळी घेतला आहे. गर्दीमुळे दारातच अडकलेल्या संजना सुरडकर या विद्यार्थिनीचा तोल गेला आणि लोकलमधून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात शोककळा पसरली आहे.
कॅम्प नंबर 4, सुभाष टेकडी येथील तक्षशिला शाळेजवळ राहणारी संजना सुरडकर ही नाहूर येथे एका कॉलेजमध्ये नर्सिंगचा कोर्स करत होती. काल सकाळी 11 च्या सुमारास नेहमीप्रमाणे तिने नाहूरला जाण्यासाठी उल्हासनगर रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. मात्र, लोकलमध्ये चढताना महिला डब्यात प्रवाश्यांनी दरवाजात गर्दी केल्यामुळे तिला आत जाता आले नाही. त्यामुळे ती दरवाजातच थांबली. गाडी स्थानक सोडून काही अंतर पुढे गेल्यानंतर ती दरवाजातून हात निसटून रेल्वे ट्रॅकवर खाली पडली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.