धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:08 IST2025-09-01T17:07:51+5:302025-09-01T17:08:38+5:30

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुरूषाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळले.

Live-in partner murdered, car stopped at traffic light, poured petrol on him and set him on fire | धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळले. घटनेच्या वेळी, महिला एका नातेवाईकासह मंदिरातून कारमधून परतत होती. आरोपीने सिग्नलवर गाडी थांबवली, तिच्यावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. मृत महिलेचे नाव वनजाक्षी आहे आणि आरोपीचे नाव विठ्ठल आहे, तो व्यवसायाने कॅब ड्रायव्हर आहे. पोलिसांनी विठ्ठलला अटक केली आहे.

वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनजाक्षी आणि विठ्ठल एकत्र राहत होते. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सगळं काही सामान्य नव्हतं. वनजाक्षी विठ्ठलच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे खूप नाराज होती. यासाठी तिने विठ्ठलला वारंवार इशारा दिला होता. ज्यावेळी त्याने ही सवय सोडली नाही, तेव्हा वनजाक्षीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. विठ्ठलला हे आवडलं नाही आणि त्याने वनजाक्षीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलिस तपासात समोर आलं.

कारचा पाठलाग करुन हत्या केली

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी वनजाक्षी तिच्या जवळच्या नातेवाईक मरियाप्पासोबत मंदिरात गेली होती. मंदिरातून परतल्यानंतर ती गाडीने परतत होती. वनजाक्षी, मरियाप्पा आणि ड्रायव्हर गाडीत होते. यादरम्यान विठ्ठलाने अचानक वनजाक्षीला पाहिले. त्याने सिग्नलवर गाडी थांबवली आणि महिलेवर पेट्रोल ओतण्यास सुरुवात केली. 

आरोपी विठ्ठला हे करताना पाहून तिघेही गाडीतून उतरले आणि पळू लागले. त्यानंतरही विठ्ठल थांबला नाही. त्याने पळून जाणाऱ्या वनजाक्षीचा पाठलाग केला आणि तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. घटनेनंतर वनजाक्षीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिचा जीव वाचू शकला नाही.

Web Title: Live-in partner murdered, car stopped at traffic light, poured petrol on him and set him on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.