The limit has been crossed! For the dowry, the husband along with the father put the blade in the wife's private part | हद्द झाली! हुंड्यासाठी पतीने वडिलांसोबत मिळून पत्नीच्या गुप्तांगात टाकले ब्लेड

हद्द झाली! हुंड्यासाठी पतीने वडिलांसोबत मिळून पत्नीच्या गुप्तांगात टाकले ब्लेड

ठळक मुद्देकुटुंबीयांनी गुलशनला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी आरोपी पती मोहम्मद जब्बारक आणि त्याच्या वडिलांना अटक केली.मुलीचे 23 जून रोजी लग्न झाले होते. तिचे वडील भाजी विक्रेता म्हणून काम करतात. घरी भाऊ आणि आई आहेत.

बिहारचा मोतिहारी जिल्हा येथे गुलशन खातून या महिलेचे 23 जून रोजी येथील चकिया गावातील तरुणाशी लग्न झाले होते. परंतु जेव्हा हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही, तेव्हा सूनेच्या अंगावर ब्लेडने वार करण्यात आले. तसेच पीडित मुलीच्या खासगी भागालाही ब्लेडने दुखापत केली आहे. कुटुंबीयांनी गुलशनला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी आरोपी पती मोहम्मद जब्बारक आणि त्याच्या वडिलांना अटक केली.

मुलीचे 23 जून रोजी लग्न झाले होते. तिचे वडील भाजी विक्रेता म्हणून काम करतात. घरी भाऊ आणि आई आहेत. लग्नासाठी गुलशनच्या वडिलांनी कर्ज घेऊन हुंडा दिला. त्यानंतरही अधिक हुंड्यासाठी तिला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. गुलशन माहेरी आली, यानंतर गुलशनचा नवरा आणि सासरा तिच्या माहेरी आला. तेथे ते दोघे एका खोलीत गुलशनशी बोलण्यासाठी म्हणून गेले आणि जेथे त्यांनी ब्लेडने तिच्या शरीरावर सपासप वार केले. तिच्या  खाजगी भागात (गुप्तांगात) ब्लेडचे दोन तुकडे आणि पाच मॅचस्टिक ठेवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी मोहम्मद जब्बरक रजाई-गादी बनवण्याचे काम करतो.

 

आरोपी मोहम्मद जब्बरक आणि त्याचे वडिल
आरोपी मोहम्मद जब्बरक आणि त्याचे वडिल


गुलशन खातून यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्यांनी हुंड्यामुळे हे सर्व वेदनादायी कृत्य केले. पीडित मुलीच्या वडिलांनी हुंडा म्हणून दीड लाख रुपयांची रोकड दिली. तरीही त्याला दुचाकी हवी होती. पीडित गुलशन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यावर तिला मुजफ्फरपूर वैद्यकीय रुग्णालयात रेफर केले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मोहम्मद जब्बरक आणि त्याच्या वडिलांना अटक केली आणि तुरुंगात पाठविले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पप्पू यादव यांना अमित शाहांनी दिलं असं उत्तर

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

Web Title: The limit has been crossed! For the dowry, the husband along with the father put the blade in the wife's private part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.