Let your porn video go viral, kill families, threaten student after gang raping pda | तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, घरच्यांना ठार मारू, गँगरेप केल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावले 

तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, घरच्यांना ठार मारू, गँगरेप केल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावले 

ठळक मुद्देही लाजीरवाणी घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे. विद्यार्थिनीने याप्रकरणी ऑनलाइन तक्रार केली तर आरोपींना ३६  तासात पोलिसांनी पकडले.

राजस्थान - लॉकडाऊनमध्ये बारावीची एक विद्यार्थी तिच्या वर्गमित्रांना रात्री भेटायला गेली असता रेल्वे कर्मचार्‍याने त्याच्या एका साथीदारासह सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर आरोपींनी या सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीला शांत राहण्यास सांगितले. विद्यार्थिनीने याप्रकरणी ऑनलाइन तक्रार केली तर आरोपींना ३६  तासात पोलिसांनी पकडले. ही लाजीरवाणी घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे.


पीडित विद्यार्थिनीने या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर दौसाच्या एसपीने स्थानिक पोलिसांकडे या घटनेची खातरजमा केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. यावर पोलिसांनी रेल्वे कर्मचारी भवानी गुर्जर आणि त्याचा साथीदार कमल गुर्जर याला अटक केली आहे. माहिती मिळाल्यानंतर 36 तासांच्या आत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

बांदीकुईचे डीएसपी संजय सिंह म्हणाले की, ही संपूर्ण घटना ७ एप्रिलच्या रात्री घडली, जेव्हा इयत्ता १२वीत शिकणारी एक विद्यार्थिनी घरी न सांगता तिच्या वर्गमित्रांना भेटायला जात होती. रात्रीच्या अंधारात ही मुलगी एकटी जात असल्याचे पाहून अरनिया गावच्या रेल्वे फाटकाजवळ दोन व्यक्तीला ती मुलगी आढळली.

संजय सिंह म्हणाले की, दोन्ही आरोपींनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला आणि घटनेचा अश्लील व्हिडिओ बनविला. घटनेनंतर आरोपीने कुणालाही घटनेबद्दल सांगितल्यास अश्लील व्हिडिओ व्हायरल करुन कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने तिच्या वर्गमित्राला घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि प्रकरण आयजी स्तरावर पोहचले जिथून संपूर्ण प्रकरणाची माहिती कोळवा पोलिस ठाण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. पोलिसांनी नुकताच या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

Web Title: Let your porn video go viral, kill families, threaten student after gang raping pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.