शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:49 IST

सोनम रघुवंशी हीचा भाऊ गोविंद याने एकदा तरी आपल्याला आपल्या बहिणीची भेट घेऊ द्यावी, अशी मागणी केली आहे.

राजा रघुवंशी हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. मेघालय पोलिसांकडून या घटनेचा तपास देखील सुरू आहे. या तपासात सोनम रघुवंशी हिच्या कुटुंबाची देखील चौकशी केली जात आहे. या दरम्यान आता सोनम रघुवंशी हीचा भाऊ गोविंद याने एकदा तरी आपल्याला आपल्या बहिणीची भेट घेऊ द्यावी, अशी मागणी केली आहे. "बहिणीला भेटल्यावर तिला विचारेन की, ती अशी का वागली", असे देखील गोविंद म्हणाला.

राजा रघुवंशी हत्येमध्ये सोनम रघुवंशी हिचा हात असल्याचे समोर आल्यापासून तिचा भाऊ गोविंद याने आपल्या बहिणीला शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. तर, त्याने आपण नेहमीच राजाच्या कुटुंबासोबत असू, असे देखील म्हटले होते. मात्र, आता गोविंद शिलाँगला जाणार असून, यावेळी सोनमला भेटून तिला या सगळ्याच जाब विचारणार आणि तिने राजाला का मारले, या प्रश्नाचे उत्तर तिच्याच तोंडून ऐकणार, असे गोविंद म्हणाला. या आधी दोघांची गाजीपूरमध्ये भेट झाली होती. मात्र, त्यावेळी गोविंदला तिच्याशी बोलता आले नव्हते.

राजाच्या कुटुंबाला परत केले सगळे दागिनेसोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नात एकूण १५ लाख रुपयांचे दागिने सोनमला तिच्या सासरहून भेट म्हणून मिळाले होते. सोनमला देण्यात आलेले हे सगळे दागिने आता राजा रघुवंशी याच्या कुटुंबाला परत केले असल्याची माहिती गोविंद याने दिली. दुसरीकडे, संतप्त झालेल्या राजाच्या कुटुंबाने त्यांना सोनमचं जिवंतपणीच श्राद्ध घालण्यास सांगितलं होतं. यावर गोविंद म्हणाला की, सोनम आता त्यांच्या घराची सून आहे, जर त्यांनी सुनेचं श्राद्ध घातलं तर आम्ही त्यांच्यासोबतच असू. 

पोलिसांच्या तपासाला वेगराजा रघुवंशी हत्याप्रकरणाचा तपास पोलीस अतिशय जलद गतीने करत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र देखील जप्त केले आहे. दुसरीकडे, सोनम आणि राजा यांच्या कुटुंबांची चौकशी देखील करण्यात आली आहे. आता पोलिसांनी सोनमचे दागिने, तिचा लॅपटॉप आणि राजाला मारण्यासाठी आणलेली बंदूक देखील शोधून काढली आहे. यावरून आता तपासाला वेगळी दिशा मिळणार आहे.      

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू