शेवटची पत्नी-पतीची भेट झालीच नाही, पत्नीला घ्यायला जाणारा तरुणाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 17:12 IST2021-01-17T17:12:10+5:302021-01-17T17:12:57+5:30
Accident : जळगावात अपघात : महामार्गावर आंदोलन

शेवटची पत्नी-पतीची भेट झालीच नाही, पत्नीला घ्यायला जाणारा तरुणाचा अपघातात मृत्यू
जळगाव : भुसावळ येथे माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला दुचाकीने जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी समोरुन येणार्या कंटेनरवर आदळल्याने समाधान श्रीराम चंदन (रा. तरसखेडा, ता. येवला, जि. नाशिक) हा तरुण जागीच ठार झाला तर (दावल अंबादास बच्छाव रा.गुजरखेडा, ता. येवला जि. नाशिक) हा गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर अजिंठा चौकापासून काही अंतरावर झाला. दरम्यान,सारखे अपघात होत असल्याने महामार्गावर अंडरग्राऊंड रस्ता तयार करण्यात यावा या मागणीसाठी रहिवाशांनी रास्ता रोको करुन अडीच वाजेपर्यंत महामार्ग रोखला होता. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयावर बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.