दिल्लीच्या सीमेवरून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी शब्बीर अहमद लोन बांगलादेशात बसून पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'एसआय'च्या (ISI) इशाऱ्यावर लष्करचं एक नवीन मॉड्यूल तयार करत होता.
दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला राजधानीच्या सीमेवर पकडलं. तपासात असं समोर आलं आहे की, तो सीमे पलिकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार भारतविरोधी कारवाया करण्याच्या मिशनवर होता. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात त्याचे आणखी किती साथीदार लपले आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.
काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि दक्षिण भारतातून लष्करच्या मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला होता. या मॉड्यूलने दिल्ली आणि कोलकातामध्ये अनेक ठिकाणी भारतविरोधी पोस्टर्स लावले होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि केंद्रीय यंत्रणांना मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.
शब्बीर अहमद लोन हे नाव सुरक्षा यंत्रणांसाठी नवीन नाही. २००७ मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला एके-४७ आणि ग्रेनेडसारख्या जड शस्त्रास्त्रांसह अटक केली होती. त्यावेळीही त्याचे संबंध थेट हाफिज सईदशी जोडलेले होते. तो २०१८ पर्यंत दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला आणि बांगलादेशला आपलं नवीन ठिकाण बनवून भारताच्या विरोधात ऑपरेशन्स हाताळू लागला होता.
Web Summary : Shabbir Ahmed Lone, a Lashkar-e-Taiba terrorist, was arrested in Delhi. He was creating a module on ISI's instructions from Bangladesh. Previously arrested in 2007, he resumed anti-India operations after release from Tihar jail, now operating from Bangladesh.
Web Summary : दिल्ली में लश्कर-ए-तैयबा का आतंकवादी शब्बीर अहमद लोन गिरफ्तार हुआ। वह बांग्लादेश से आईएसआई के निर्देशों पर एक मॉड्यूल बना रहा था। पहले 2007 में गिरफ्तार, तिहाड़ जेल से रिहा होने के बाद उसने भारत विरोधी अभियान फिर शुरू किए, अब बांग्लादेश से संचालन कर रहा था।