शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 15:50 IST

एटीएममध्ये जमा करण्याचे कंत्राट घेतलेल्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आज विविध ठिकाणाहून १७ लाखांची रोकड गोळा केली.

ठळक मुद्देसोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.टनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. या फुटेजच्या मदतीने लुटारूचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

नागपूर : दुचाकीवर आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १७ लाख रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विविध ठिकाणाहून रोकड गोळा करून ती बँकेत, एटीएममध्ये जमा करण्याचे कंत्राट घेतलेल्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आज विविध ठिकाणाहून १७ लाखांची रोकड गोळा केली. ही रोकड बँकेत जमा करण्यासाठी कंपनीचे दोन कर्मचारी एका दुचाकीवर निघाले. आमदार निवास जवळच्या राजाराणी चौकात येताच मागून दोन दुचाकीवर आलेल्या सहा लुटारूंपैकी एकाने लाथ मारून दुचाकीवरील कर्मचाऱ्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळची १७ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून लुटारू पळून गेले. या घटनेमुळे हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीच्या वरिष्ठांना लुटमारीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्ष आणि सीताबर्डी पोलिसांना माहिती कळविण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या लूटमारीच्या घटनेमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. सीताबर्डीचा पोलीस ताफा, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथे पीडित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. या फुटेजच्या मदतीने लुटारूचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

 

... म्हणून पोलिसांनी जळत्या प्रेतावर पाणी टाकलं अन् अंत्यसंस्कार विधी थांबवला

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसnagpurनागपूरcctvसीसीटीव्ही